तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

परळी तालुक्यातील चार्‍याची सोय नाही ; पशुधन संकटात शेतकर्‍यांनी केली चार्‍याची प्रशासनाकडे मागणी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि.12
    परळी तालुक्यात दुष्काळाची गंभीर स्थिती असतांनाही पशुधनांसाठी शासनाने चारा उपलबध करुन दिला नाही. पाणी नाही चारा नाही, पशुधन कसायाच्या दारी अशी स्थिती असतांनाही शासन गंभीर होत नाही. शासनाने चार्‍याची सोय करण्याची मागणी तालुक्यातील विविध गावच्या शेतकर्‍यांनी परळीच्या तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 
    शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी परळी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने दिपावली नंतर तालुक्यातील बहुतांश गावातील पाणी साठे आटत चालली आहेत. तसेच परळी तालुक्याचा मोठा भाग डोंगर पट्टयात येत असल्याने जनावरांना उपलब्ध होणारा चाराही संपत चालला आहे. यामुळे पशु पालकांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. परळी तालुक्यात पशुधन मोठ्या प्रमाणावर असुन दुधाच्या उत्पादनासाठी तालुका प्रसिध्द आहे. अशा या दुष्काळी परिस्थतीत पशुधन कसे जगवावे असा आमच्यापुढे प्रश्‍न आहे. सध्या आमच्याकडे पुढील दहा दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. प्रशासनाकडुन आम्हाला चारा व पाण्याच्या मदतीची नितांत गरज असुन आम्हाला चारा छावण्या सुरु करण्याऐवजी थेट दावणीवर चारा उपलब्ध करुन दिला तर आमचे पशुधन वाचु शकते. अन्यथा आम्हाला आमची जनावरे विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तसेच आमच्या गावामध्ये जनावरासह माणसांना पिण्याच्या पाण्याची उणीव जाणवत असुन नजीकच्या काळात तीव्र पाणी टंचाई होणार आहे. तरी प्रशासन म्हणुन आपण यासाठी योग्यती तजवीज करावी व आम्हाला दावणीवर चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी व्यंकटी परमेश्‍वर गित्ते, ह.भ.प.वासुदेव महाराज शास्त्री मुंडे, श्रीकांत बहिरे, सोमनाथ गित्ते, विठ्ठल साखरे , अमोल बदने, महादेव केंद्रे, दिपक राठोड, गणेश दौंड, बालाजी मुंडे, शाम मुंडे, आकाश गित्ते, गणेश मुंडे, भास्कर मुंडे, अशोक काळे, गोपाळ चाटे, अनंत फड, सतिश दराडे, ईश्‍वर फड, संभाजी आघाव, राम आघाव, सुधाव पवार, मुंजाजी गित्ते, आदीनाथ गित्ते, बामाजी फड, प्रदिप फड, सोमनाथ गित्ते, पिंटु गित्ते, लक्ष्मण गित्ते, बालाजी गित्ते, गोविंद राख, सुर्यकांत जगताप, नरहारी गित्ते, शिवकुमार गित्ते, अरुण गित्ते, राजु गित्ते, मोसीन सय्यद, गंगाधर केंद्रे, कुंडलिक गित्ते, परमेश्‍वर गित्ते, ह.भ.प.राम महाराज मुंडे, शैलेश मुंडे, महोदव  फुलचंद गित्ते मलकापूरकर,नंदागौळ, कन्हेरवाडी, मरळवाडी,  व तसेच तालुक्यातील विविध गावच्या इतर शेतकर्‍यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment