तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!tej news

Monday, 11 February 2019

सोळाव्या लोकसभेत एक हजाराहून जास्त प्रश्न विचारणारे महाराष्ट्रातील खासदार


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई: दि.११ लोकसभा निवडणुकीची हवा तापत आहे.या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोप होत आहेत.हया मध्ये आपण काय विकासाची कामे केली कशी केली आणि ती जनतेसमोर कसे पाहोचयाची ह्याची तयारी जोरात चालू आहे.या रणधुमाळीत पक्ष कोणाच्या गळ्यात माळ घालील हे सांगता येत नाही .लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील आणि उमेदवार आपल्याकडे मतं मागायला यायला सुरुवात करतील. हीच वेळ  मतदारांसाठी कळीची आहे. २०१४ साली राज्यातून लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदारांनी तिथे नेमकी काय कामगिरी केली, याचा आढावा…
आपल्या प्रभागातून जनतेने निवडून देणारे खासदार आपल्या विभागातील किती प्रश्न मांडतात आणि कशाप्रकारे ते प्रश्नाची उत्तरे मिळून जास्तीत जास्त निधी आपल्या प्रभागात आणून विकास उपयोगी कामे करतात .महाराष्ट्रातील तब्बल ७ खासदारांनी महत्वाची भूमिका बजावली .महाराष्ट्रात तब्बल ४८ खासदार आहेत महाराष्ट्रातून आपण निवडून दिलेले ४८ खासदार तिथे कोणते प्रश्न विचारतात, त्या प्रश्नांचे विषय काय असतात, त्यांची विचारदिशा काय असते हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभा सदस्याविषयी तर ही सगळी माहिती आपल्याला असायलाच हवी.
खासदार १)शिवाजीराव आढळरावपाटील.शिवसेना.शिरुर मतदारसंघ प्रश्न १०८१ .२)आनंदराव अडसुळ.शिवसेना.अमरावती.प्रश्न १०३८ ३)सुप्रिया सुळे.रा.कॉ.बारामती.प्रश्न ११६३ ४)श्री धनंजय महाडिक.रा.कॉ.कोल्हापूर प्रश्न ११५५ .५)विजय सिंह मोहितेपाटील.रा.कॉ.माढा. १११४ ६)हीना गावित.भाजप.नंदूबार प्रश्न १०७६ .७)राजीवा सातव.कॉग्रेस .हिंगोली.प्रश्न १०९७ वरील खासदारांनी लोकभावनेचा आदर करुन.आपली कामगिरी सार्थ  ठरविली.व या १६ अधिवेशनांत तारांकित आणि अतारांकित मिळून एकूण ७७,३६५ प्रश्न उपस्थित केले गेले. त्यापैकी महाराष्ट्राच्या खासदारांनी २६,७२५ प्रश्न उपस्थित केले.

No comments:

Post a Comment