तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

शिवजन्मोत्सवा निमित्त वाघाळा येथे तीन दिवस विविध कार्यक्रमप्रतिनिधी
पाथरी:- तालुक्यातील वाघाळा येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सवा निमित्य 17ते19 फेब्रुवारी पर्यंत कलामोहत्सवा सह विविध सामाजिक उपक्रमांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती या मोहत्सवाचे आजोजक भागवत उर्फ बंटी पाटील घुंबरे यांनी दिली.
या सार्वजनिक शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे उदघाटन 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता पाथरीचे उपविभागिय अधिकारी व्हि एल कोळी यांच्या हस्ते होणार असून या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पाथरीच्या तहसिलदार भाग्यश्री देशमुख या राहाणार आहेत तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ जगदिश शिंदे माजी सरपंच नागोराव घुंबरे, अँड अशोकराव घुंबरे,कृऊबास चे संचालक गणेश पाटील, माजी उप सरपंच विकास घुंबरे, सरपंच अर्चना घुंबरे, ग्रामसेवक एच व्ही चिंचाने, संदिपान घुंबरे, मुख्याध्यापक सुनैना चव्हाण, पी पी पाटील, डॉ मधूकर घुंबरे, पदमाकर मोकाशे, डि बी मोकाशे, स्वराज घुंबरे, यु जी स्वामी,संपादक किरण घुंबरे पाटील ,रेखाताई बाविस्कर, दादासाहेब घुंबरे यांची उपस्थिती राहाणार आहे. या वेळी बीड जिल्हा सत्र न्यायालयातील अँड ज्ञानेश्वर मस्के पाटील आणि बालासाहेब काळे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. तत्पुर्वी सकाळी अकरा वाजता रक्तदान करण्यात येणार आहे. तर 18 रोजी सायंकाळी आठ वाजता औंढा नागनाथ येथील ह भ प शिवचरीत्रकार उमेश महाराज कदम यांच्या किर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. 19 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला  शिवरुद्राभिषेक घालण्यात येणार आहे. त्या नंतर सायंकाळी सात वाजता शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक आणि रात्री आठ वाजता शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतीक कला मोहत्सवात समुहनृत्य आणि वैयक्तिक नृत्याच्या स्पर्धा प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटात होतील. या कार्यक्रमाचा लाभ घेण्या साठी पंचक्रोशितील नागरीकांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन बंटी पाटील मित्र मंडळ आणि राजमुद्रा ग्रुप वाघाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

1 comment:

  1. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करतात याचा आंनद आहे.
    आपल्या कार्यास सलाम आणि हार्दिक शुभेच्छा...💐💐💐

    जय जिजाऊ जय शिवराय

    ReplyDelete