तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 February 2019

ना. पंकजाताई मुंडेंच्या संकल्पनेतील विकासदर्शिकेचे गांवा-गांवात होतेयं स्वागत!
आयडियल कॅलेंडरमधून मांडला मतदारसंघाच्या विकासाचा लेखाजोखा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. ०८ ------  राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनूतून साकार झालेल्या 'विकासदर्शिका' चे गांवा-गांवात स्वागत होत असून मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकास कामांची माहिती हया अनोख्या कॅलेंडरच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत गेल्याने ग्रामस्थांमध्ये एक चांगला संदेश पोहोचला आहे. 

   पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी सत्तेच्या माध्यमातून बीड जिल्हयात तसेच परळी मतदारसंघात विकासाच्या विविध योजना राबवून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. ग्रामीण रस्त्यांचे जाळे, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, जलयुक्त शिवार, आरोग्य केंद्र, प्रशासकीय इमारती, सुरळीत वीज पुरवठा यासह अनेक योजना त्यांनी यशस्वरित्या राबवल्या. महा आरोग्य शिबीराचे आयोजन करून शेकडो गोरगरीब रूग्णांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. शेतक-यांना विमा  तसेच वेगवेगळ्या स्वरूपात अनुदान मिळवून दिले. गेल्या चार वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी घेतलेला विकासाचा ध्यास, पुर्ण झालेली व प्रगतीपथावर असलेली कामे याचा एकत्रित लेखाजोखा या 'विकासदर्शिका' मधून मांडण्यात आला आहे. महिना, तारीख, तिथी, मुहूर्त, महापुरूषांच्या जयंत्या यांबरोबरच सुबक व आकर्षक मांडणी स्वरूपात हया विकासदर्शिकेच्या प्रत्येक महिन्याच्या पानांवर विकास कामांचा आढावा, आलेला निधी याची माहिती देण्यात आली आहे. 

   विकासदर्शिकेचे प्रकाशन गेल्या आठवड्यात परळी येथे यशःश्री निवासस्थानी ना. पंकजाताई मुंडे, त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे तसेच भाजपा पदाधिका-यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. संपूर्ण मतदारसंघात ही विकासदर्शिका वितरित करण्यात येत आहे. ना. पंकजाताई मुंडे यांनी केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यात ही विकासदर्शिका यशस्वी झाली असून या अनोख्या कॅलेंडरचे गांवा-गांवात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे. प्रत्येकांनी आपल्या घरात या विकासदर्शिकेला अग्रणी स्थान दिले असून कॅलेंडर विषयी जनतेत कुतूहल निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment