तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

शिजन्मोत्सवा निमित्त पाथरीत शेख सुभान अली यांचे व्याख्यानप्रतिनिधी
पाथरी:-कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महारांच्या जन्मोत्सवा निमित्त पाथरी येथिल हुतात्मा स्मारक परिसरात शिवचरीत्रावर शेख सुभान अली यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
 या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आ बाबाजानी दुर्रानी हे राहाणार आहे.सार्वजनिक शिवजन्मेत्सव समितीच्या वतीने मंगळवार १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजता व्याख्यानाला सुरूवात होणार आहे. याच दिवशी ओंकार सेवाभवी संस्थेच्या वतीने भव्य असा सामुदाईक विवाह सोहळा दुपारी संपन्न होणार आहे. या व्याख्यान कार्यक्रमा साठी जास्तित जास्त शिवप्रेमींनी उपस्थित राहाण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment