तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!tej news

Tuesday, 5 February 2019

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेत आनंदनगरी कार्यक्रम संपन्न


प्रतिनिधी
पाथरी:- दि 5 फेब्रुवारी  मंगळवार रोजी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा माळीवाडा ता पाथरी जि परभणी येथे आज आनंदनगरी घेण्यात आली.
पाथरी शहराचे नगराध्यक्ष तथा या शाळेचे पालक नितेश भोरे, नगरसेवक अलोक चौधरी, गोविंद हारकळ ,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष शिवाजी वांगीकर,मुख्याध्यापक चिंचाणे  यांनी आनंद नगरीचे उदघाटन केले.

पालकां साठी संगीतखुर्ची हा खेळ घेण्यात आला , माता-पालक यांनी भरपूर प्रमाणात सहभाग नोंदवला,शाळेच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला.

दप्तराविना शाळा असल्या मुळे चिमुकल्यांचा जल्लोष गगणात मावत नव्हता.मुलांनी स्वतः घरी बनवून आणलेले पदार्थ विक्री साठी आणले होते, कुणी समोसा, कुणी फ्रुट सॅलट,वडापाव,भेळ,
चकल्या, शेतातीलबोरे,गाजर, पेरू,पपई, हरभरा टाळ, केळी, चहा,इडली,असे विविध पदार्थ ,फळे विक्री साठी आणली होती, पालक ,शिक्षक, विध्यार्थी यांनी या नवनवीन पदार्था ची खरेदी करून आस्वाद घेतला.

या उपक्रमाचा उद्देश मुलांना आर्थिक व्यवहार समजावेत, व्यवहारिक गणित समजावं, आपला माल मार्केटिंग समजावी, एकमेकांशी संवाद व्हावा, विचारांची देवाण-घेवाण व्हावी,आपला माल विक्री करून नफा कसा मिळवता येतो हे समजले, भविष्यातील भावी उद्दोजक होण्या साठी प्रेरणा मिळावी, हा निखळ हेतू होता असे सांगितले.

आजचा आनंद बाजार पालक ,शिक्षक ,चिमुकल्या साठी पर्वणी होती,सदर आनंदनगरी यशस्वी करण्या साठी सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.
माळीवाडा शाळेत पहिल्यांदाच आनंदनगरी साजरी झाली त्यामुळं पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्या साठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षक टीम चे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व समिती यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment