तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

संत बिरबलनाथ महाराज यांचा यात्रा महोत्सवाची जय्यत तयारीफुलचंद भगत(जिल्हा प्रतिनिधी)

मंगरुळपीर-सालाबाद प्रमाणे यंदाही
योग तपस्वी संत श्री बिरबलनाथ महाराज
यांचा  यात्रा महोत्सव दि२२फेब्रुवारी पासुन
३मार्च २०१९पर्यंत आयोजित करण्यात आला
आहे.मंदीरात यात्रोत्सवाची जय्यत तयारी
सुरु असुन संत बिरबलनाथ महाराज यांनी
आगोदरच जाहीर करुन फेब्रुवारी महीन्याच्या 
पौर्णिमेच्या दिवशी जीवंत समाधी घेतलेल्या
दिवसानिमित्त दि१९फेब्रुवारी पौर्णिमेच्या
दिवशी दुपारी ३ते७वाजे पर्यंत अभिषेक व होम व पुजेचा कार्यक्रम होणार आहे.
दि.२२रोजी शुक्रवारी बिरबलनाथ महाराज
यांच्या लघुचरित्र ग्रंथाचे वाचन ह.भ.प 
विठ्ठलदास महाराज यांचे वाणीतुन
होणार आहे.दि.२३ शुक्रवार रोजी दुपारी १२वाजेपासुन ५वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन महीला  व पुरुष  अशा दोन लाइन बारीतुन महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.महाप्रसाद पुजा संत भोलेनाथ महाराज,अभेदनाथ गुरु सेवा नाथ,प्रकाश महाराज शालवाले यांचे हस्ते होणार  आहे.संध्याकाळी ७वाजता ह.भ.प विशाल महाराज आळंदीकर यांचा विनोदाने भरपुर असलेला जंगी किर्तनाचा  कार्यक्रम होणार आहे.दि.२४ रविवार रोजी सकाळी 
९वाजता श्रींच्या पालखीची मिरवणुक,दुपारी
१२ते१.३०वाजेपर्यंत दहीहांडी व गोपालकाला
किर्तन महीला  किर्तनकार ह.भ.प.छबु अवताडे यांचे मधुर वाणीतुन संत बाबु महाराज यांचे उपस्थितित होणार आहे.
दि.२४रोजी संध्याकाळी ६वाजता राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज विरचित भजनाची भव्य
खंजेरी भजन स्पर्धा होणार असुन स्पर्धेतील
विजेत्यासाठी प्रथम ११हजार रुपये,द्वितीय
१०हजार रुपये अशी अनुक्रमे २०बक्षिसांची
योजना संत अच्युत महाराज भजन स्पर्धा
समितिच्या वतीने करण्यात आली आहे.
दि.२५रोजी भजन स्पर्धेचा उर्वरीत कार्यक्रम
व दुपारी १२वाजता अपंग विद्यालय मंगरुळनाथ येथील विद्यार्थ्यांना कपडे,
ब्लॅन्केट,शालेय साहीत्य वाटप ह.भ.प सिताराम महाराज यांचे हस्ते व स्नेह
भोजनाचा कार्यक्रम संस्थानच्या वतीने होणार
आहे.दि.२६मंगळवारी हनुमंत महीला भजन मंडळ दि.२७रोजी संतोषी माता महीला  भजन मंडळ,दि.२८रोजी सिद्धेश्वर महीला भजन
मंडळ १मार्च रोजी  आराधी महीला भजन
मंडळ,२मार्च रोजी सदानंद बाबा महीला
भजन मंडळ,३मार्च रोजी रेणुका माता महीला
भजन मंडळाचा भजनांचा व हरीपाठाचा
कार्यक्रम होणार आहे.सर्व भजनी मंडळे
पालखी व मिरवणुकीत सहभागी होणार
आहे.मिरवणुकीत ह.भ.प.श्रीराम महाराज
राउत,ह.भ.प मारोतराव वाघ,ह,भ.प शोभा पाटील राउत,सुमित्रा जिरे
यांचा भजनांचा कार्यक्रम होणार आहे.
यात्रोत्सवातील कार्यक्रमास मंगरुळपीर तालुका पत्रकार संघाचे विशेष सहकार्य लाभत
आहे.तरी यात्रोत्सवातील सर्व कार्यक्रमाचा
लाभ जनतेने घ्यावा असे आवाहन संस्थानच्या
अध्यक्षा पुष्पा रामकुमार रघुवंशी यांनी
केले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment