तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!tej news

Tuesday, 5 February 2019

अल्पवयीन मुलीवर बलत्कार,चौघावर गुन्हा दाखल.दोघे अटकेत.


बांदरवाडा येथील घटना.

प्रतिनिधी
पाथरी:-तालुक्यातील बांदरवाडा शिवारात एका अल्पवयीन मुलीवर तीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित करुन अनेकवेळा बलत्कार केल्याची घटना.दि.29 जानेवारी रोजी उघडकीस आली आहे.या प्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन चार जणावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.
 या विषयी मिळालेल्या माहिती नुसार बांदरवाडा येथील अनिल लक्षीमण भिसे वय 20 वर्ष,प्रताप बाबाराव साळवे वय 29 वर्ष,व किरण रामभाऊ पाईकराव वय 32 वर्ष राहणार गौतमनगर पाथरी आणि अक्षय परमेश्वर शिंदे यांनी दि.20 मे 2018 ते 29 जानेवारी 2019 या कालावधीत गावातीलच अल्पवयीन मुलीशी तिच्या इच्छेविरुद्ध संमंती नसतांना बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्थापित करुन वारंवार बलत्कार केला.अल्पवयीन पिडीत मुलीने पाथरी पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांवर भा.द.वि. कलम 376 (2)(एन),376 (3),342,34 पोस्को 4, 6 प्रमाणे पाथरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अनिल लक्षमण भिसे व प्रताप बाबाराव साळवे या दोघांना अटक करण्यात आली आहे.या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधगीरे हे करत आहेत.

No comments:

Post a Comment