वधू-वरांच्या नोंदणीची १० फेब्रुवारी शेवटची तारीख
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. ०८ ------- गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने येत्या २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात इच्छुक वधू-वर पालकांनी जास्तीत जास्त नोंदणी करून या सामाजिक उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे परळी तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया व अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख यांनी केले आहे.
दुष्काळात सापडलेल्या पालकांना मदतीचा हात देण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात वधू वरांचे कपडे, सोन्याचे मनी मंगळसुत्र, संसारोपयोगी साहित्य देवून ना. पंकजाताई मुंडे हया कन्यादान करणार आहेत. जास्तीत जास्त इच्छुक वधू-वरांना याचा लाभ व्हावा या दृष्टीने ना. पंकजाताई मुंडे यांनी सोहळ्याची तारीख वाढवली होती, त्यानुसार हा सोहळा आता २२ फेब्रुवारी सायंकाळी ६ वा. होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी परळीत येणार आहेत.
नांव नोंदणी १० फेब्रुवारी पर्यंत
------------------------------------
सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी विवाहेच्छू वधू वरांना किंवा त्यांच्या पालकांना १० फेब्रुवारी पर्यंत नांव नोंदणी करता येणार आहे. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या परळी व (अरूणोदय मार्केट), अंबाजोगाई (डाॅ. आंबेडकर चौक) येथील संपर्क कार्यालयात ही नोंदणी सुरू आहे. विवाहाची नोंदणी पुर्णपणे मोफत असून त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, मात्र नोंदणीसाठी जन्माचा दाखला, आधार कार्ड, वधू व वरांचे पासपोर्ट आकाराचे प्रत्येकी दोन फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गुट्टे, लोहिया व देशमुख यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment