तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 February 2019

संजय गांधी निराधार योजनेचा पाञ लाभार्थ्यांनी लाभ घेन्याचे आवाहनफुलचंद भगत(जिल्हा प्रतिनिधी)
मंगरुळपीर-तालुक्यातील सर्व गोरगरीब पाञ लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजनेसाठी आवश्यक ती कागदपञे सादर करुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा.नंदलाल पवार यांनी केले आहे.
             शासनस्तरावर गोरगरिब,गरजु लोकांसाठी जीवनस्तर ऊंचावा तसेच कुटुंबाला आधार व्हावा यासाठी विविध योजना राबविन्यात येत असतात.समाजातील वंचीत घटकांना न्याय मिळावा यासाठी योजना राबविन्याच्या सुचनाही वेळोवेळी देन्यात येत असतात.प्रत्येक योजना समाजातील खालच्या स्तरापर्यतही जावी जनेकरुन गरजु आणी पाञ लाभार्थ्यांना त्याचा फायदा होईल याविषयीही काळजी घेन्यात येत असते.शासनाची संजय गांधी निराधार योजनाही अशीच स्तुत्यपुर्ण असुन या योजनेमुळे लाभार्थ्यांना सरकारच्या मदतीचा हात मिळतो.परंतु या योजनेसाठी बोगस लोकांची नावे समाविष्ठ करुन पाञ लाभार्थ्यांना डावलन्याचा प्रकारही होत असल्याने खरे लाभार्थी योजनेपासुन वंचीत राहतात त्यामुळे मंगरुळपीर तालुक्यात यानंतर संजय गांधी निराधार योजना अतिशय पारदर्शक आणी नियमाला आधिनस्त राहुन राबावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करन्यासाठी प्रशासन सज्ज झाले असुन तालुक्यातील पाञ लाभार्थ्यांनी आवश्यक ती कागदपञे सादर करुन या योजनेचा फायदा घ्यावा तसेच या योजनेसंदर्भात काही अडचणी असल्यास संजय गांधी निराधार योजना समितीचे मंगरुळपीर तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष नंदलाल पवार यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार लखन मलिक यांनी केले आहे.यापुढे संजय गांधी निराधार योजनेमध्ये पाञ लाभार्थ्यांनी आवश्यक दस्ताएवज सादर करावे,काही अडचणी असल्यास त्वरीत सोडवन्यात येईल तसेच बोगसबाजी या योजनेमध्ये खपवुन घेन्यात येणार नसल्याचे संगानियो चे अध्यक्ष नंदलाल पवार यांनी सांगीतले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment