तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 February 2019

समाजकार्याच्या विद्यार्थ्याची आदिवासी समुदायाला भेट



 विद्यार्थ्यानी जाणून घेतल्या समस्या 

 विविध योजनेची जाणून घेतली माहिती 

फुलचंद भगत
वाशिम (जिल्हा प्रतिनिधी ) दि .12 रोजी सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम च्या वतीने एम .एस .डब्लू .भाग दोन च्या विद्यार्थी यांना चौथ्या सेमिस्टर च्या अनुषंगाने संस्था अभ्यास दौरा करून विविध माहिती घेवून सादर करणे अनिवार्य असल्याने हे विध्यार्थी प्रा .पि .एन .संधानी यांच्या मार्गदर्शनाखाली  दिनांक12 रोजी  हिंगोली तालुक्यातील अंधारवाडी या गावातील आदिवासी समुदायाला भेट देवून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या .व येथील ग्रामपंचायतची स्थापणा व कार्यप्रणाली , उदेश्य , कामकाज , ऐतिहासीक लेखाजोखा ,ग्रामपंचायत ने राबविलेले विविध उपक्रम व सद्या कार्यरत पायाभूत सुवीधा , प्रशासकीय यंत्रणा त्याच बरोबर शासकीय योजना , युवक , महिला , ग्रुहस्थ यांच्यासोबत चर्चा करून माहिती घेण्यात आली .यावेळी विद्यार्थी प्रविण पट्टेबहादूर ,अंकुश ढेले , प्रकाश नेतने , साईनाथ वाघमारे , अमोल चव्हाण , ओम सानप , सूरज जयस्वाल , कु दैवता चाटसे , मंगल शिरसाठ इत्यादी विद्यार्थी यांनी ही माहिती घेतली .

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment