तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 February 2019

गरोदर महिलांचा ओटीभरण कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी
पाथरी:-एकात्मिक बालविकास नागरी प्रकल्प परभणी अंतर्गत असलेल्या पाथरीतील अंगनवाडी केंद्र क्र. 116 च्या वतिने आझादनगर येथिल कन्या शाळेत बुधवार 6 फेब्रुवारी रोजी सुपोषण आहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पाच ते सात महिने गरोदर असना-या स्रियांचा ओटीभरण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आयुब खान हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कन्या शाळेचे मुख्याध्यापक शेख युनूस , माता समिती अध्यक्ष खाजा बी रहीम खॉ माता समिती उपाध्यक्षा सौ भारती यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमा साठी परिसरातील महिलांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या यशस्वितते साठी अंगनवाडी कार्यकर्ती नखिबजहॉ फारोकी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment