तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 February 2019

जागतिक सुर्यनमस्कार दिन साजरा


सोनपेठ (प्रतिनिधी) :- 
सोनपेठ येथे पतंजलि योग समिती, सोनपेठच्या वतीने जागतिक सुर्यनमस्कार दिन 2019 मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जय भवानी मित्रमंडळ व पतंजलिचे योग समिती, सोनपेठ च्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग-प्राणायाम शिबीरामध्ये दिनांक 12 फेब्रुवारी रोजी जागतिक सुर्यनमस्कार दिन 2019 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
             या दिवशी प्रा.विठ्ठल जायभाये, श्री मोहन चोलवार, श्री नागनाथ कोटुळे आदि योग शिक्षकांनी सुर्यनमस्काराची प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांकडून करून घेतली. या सुर्यनमस्कार दिन कार्यक्रमास सोनपेठ शहरातील स्त्री-पुरुषांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. याप्रसंगी पतंजलिचे सर्वश्री नागनाथ सातभाई, बळीराम काटे, राधाकिशन हिक्के, बळीराम पांचाळ, पाथरकर तसेच शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थीनीं मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment