तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 February 2019

रेती तस्करी प्रकरणाची वाशिम येथे अप्पर जिल्हाधिकारी करणार सुनावणी


मंगरुळपीर येथील आॅडिओ क्लिप प्रकरण

मंगरुळपीर ता ७/(तालुका प्रतिनिधी) येथील बहुचर्चित तहसील कार्यालयातील रेती तस्करी प्रकरणात ता ८ रोजी वाशिम येथे अप्पर जिल्हाधिकारी हे सुनावणी घेणार आहेत.
                                मंगरुळपीर येथील तहसीलदार यांचे  ऑडिओ क्लिप प्रकरणी  विभागीय  आयुक्त यांनी सदर प्रकरणात अप्पर जिल्हाधिकारी वाशीम यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केलेली होती.  त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिनांक 08/ 02/ 2019 रोजी दुपारी 1:00 वाजता सदर प्रकरणात सुनावणी ठेवली आहे. यावेळी लेफ्टनंट कमांडर डॉ.  अलीम पटेल  राज्य कार्यकारिणी सदस्य तथा अमरावती लोकसभा  प्रमुख आणि वाशीम -यवतमाळ लोकसभा प्रमुख वसंतराव ढोके हे उपस्थित राहणार आहेत.यावेळी आम आदमी पक्षाच्या अमरावती विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आम आदमी पक्षाचे वाशिम,मंगरुळपीर विधानसभा प्रमुख सुरेश सातरोटे यांनी केले आहे.
सदर प्रकरणावर वाशिम जिल्हावाशीयांचे लक्ष लागले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment