तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 February 2019

लग्न समारंभात वाढतेय राजकीय नेत्यांची गर्दी...!वधू-वर पित्याचीही होत आहे दमछाक...!

गणेश एन. सोळुंके (भोकरदन ग्रामीण)
--------------------------------

भोकरदन परिसरा मध्ये गेल्या वर्षी च्या तुलनेत यावर्षी लगीन घाई ची सुरवात जोरात सुरु झाली आहे. त्यातच निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने लग्न मंडपात जणू काही निवडणूक प्रचार सुरु आहे कि काय असं वाटायला लागलंय. छोट्या-मोठ्या लग्न समारंभात सर्वच पक्षांची राजकीय नेते मंडळी हजेरी लावताना दिसून येत आहेत. या सर्वांच्या आगमनाने वधू किंवा वर पित्याचीही चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे.
यावर्षी लग्नतिथी कमी असल्याने एकाच तिथीवर मोठ्या संख्येने लग्न व इतर समारंभ येत आहेत. या मुळे या लग्न समारंभाला उपस्थिती लावताना पुढाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. प्रत्येकाच्या खिशात ३० ते ३५ लग्न समारंभाची यादी असल्याने प्रत्येक विवाह सोहळयास उपस्थिती लावणे शक्य नसल्यामुळे पुढारी दिवसभरात या सोहळ्यातील कुठल्या तरी एका विधीस हजेरी लावत आहेत. इतकी धावपळ करूनही सर्वच लग्नास भेटी देणे शक्य नसल्याने मोबईलवरूनही शुभेच्छा देण्याचा मार्ग शोधून काढण्यात आला आहे. 
या लग्नसराईच्या भेटीगाठीत विवाह सोहळ्यास भेट देण्याबरोबरच एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करणारे उमेदवारही एकमेकांना भेटत आहेत. बऱ्याच विवाह सोहळ्यात या सर्व उमेदवारांचा एकत्र बसून गप्पा मारण्याचा सुद्धा योग येत आहे.  पुढाऱ्यांच्या या हजेरीतून बरेच विनोदी किस्सेही घडत आहेत. हे सर्व एकत्र बसल्यावर कोण कोणाला भेटले, निवडणुकीनंतर कोणी कोणाशी जुळवून घाईल, कोणाचे काय चालले यावर टोमणेबाजी करून मार्मिक चर्चेच्या फैरी झडत आहेत. पुढाऱ्यांच्या विविध सोहळ्यांना लागत असलेल्या या हजेरीवरून व तेथे त्यांच्यात झडत असलेल्या चर्चेच्या फेऱ्यांवरून विविध अंदाज लावणाऱ्यांचीही कमी नाही. याबरोबरच पुढारीही यापूर्वी कोणी कोणाला मतदान केले हे विसरून विवाह सोहळ्यांना हजेरी लावत आहेत. या विवाह सोहळ्यांच्या अवाक्याबाहेरील तिथींना तोंड देण्यासाठी पुढाऱ्यांची मुले व सौभाग्यवतीही हजेरी लावून वधू व वर पित्याचे समाधान करीत आहेत.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी : गणेश एन. सोळुंके, भोकरदन ग्रामीण.
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं.7888257555
व्हाॅट्स अॅप : 8390132085  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a comment