तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 February 2019

समाजकार्याच्या विद्यार्थ्यानी जाणून घेतली कौटुंबिक समुपदेशन केंद्राची कार्यप्रणाली



 विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष पाहिले संस्थेचे कामकाज 

 विविध उपक्रमाची घेतली नोंद 

फुलचंद भगत
वाशिम (जिल्हा प्रतिनिधी ) दि .11 स्थानिक येथील सरस्वती समाजकार्य महा विद्यालय वाशिम च्या वतीने एम .एस .डब्लू .भाग दोन च्या विद्यार्थी यांना चौथ्या सेमिस्टर च्या अनुषंगाने संस्था अभ्यास दौरा करून विविध माहिती घेवून सादर करणे अनिवार्य असल्याने हे विध्यार्थी प्रा .पि .एन .संधानी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 11रोजी येथील उज्वल या प्रसिध्द संस्थे  अंतर्गत असलेले महिला कौटुंबिक समुपदेशन केंद्राला भेट देवून तेथील कार्यप्रणाली , उदेश्य , कामकाज , ऐतिहासीक लेखाजोखा , संस्थेने राबविलेले विविध उपक्रम व सद्या कार्यरत उपक्रम , संस्थेचा उगम , तेथील पायाभूत सुवीधा , प्रशासकीय यंत्रणा तसेच विविध बाबींची विध्यार्थी यांनी नोंद घेतली .याच अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती घेण्यात आली .ही माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाईकराव यांनी सखोल माहिती देवून विद्यार्थी यांचे अभिनंदन केले . यावेळी संस्थेचे सचिव उज्वल पाईकराव , मुख्या  धीपीका सौ प्रगती व्यास उपस्थित होत्या . यावेळी विद्यार्थी प्रविण पट्टेबहादूर , अंकुश ढेले , प्रकाश नेतने , साईनाथ वाघमारे , अमोल चव्हाण , ओम सानप , सूरज जयस्वाल , कु दैवता चाटसे , मंगल शिरसाठ इत्यादी विद्यार्थी यांनी माहिती घेतली .

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment