तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!tej news

Monday, 11 February 2019

शुद्ध मनाने शिवपूजन करा - स्वामी डॉ.गुट्टे महाराज ■ मीराबाई संस्थान आयोजित शिवमहापुराण कथेत प्रतिपादनधर्मापुरी प्रतिनिधी

पाटोदा तालुक्यातील श्री संत मीराबाई आईसाहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त गतवर्षीप्रमाणे वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
     यावेळी शिवमहापूराण कथेचे दुसरे पुष्प गुंफताना विविध दाखले देत शिवाचे महात्म्य प्रतिपादित केले. भगवंताची पूजा करताना कुठल्याही प्रकारचे फुल, अक्षदा नसेल तरीही चालेल पण मनाचा भाव शुद्ध असला पाहिजे. आणि शुद्ध मनाने केलेली पुजाच भगवंताला मान्य आहे. शिवपूजन हे  मानवी जन्माचे अंतिम ध्येय असून संपूर्ण संसाराचा विस्तार भगवान शंकरापासून झाला आहे... शिव शिव च्या उच्चाराने मानवी जीवनच कल्याण होत,  शिवाच्या नामजपाणे मनात उर्जात्मक स्पंदने निर्माण होतात. चांगले विचार, चांगले संस्काराचे दर्शन म्हणजेच शिवपूजा होय असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन चे संस्थापक डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांनी केले यावेळी गायक/संगीत गणेश कांबळे, बिभीषण कांबळे, मृदंग वादक अच्युत गुट्टे यांनी साथ दिली.
        यावेळी सोमवार निमित्त हजारो भाविकांनी सामुदायिक रुद्राभिषेक व नामजप केला. डॉ.गुट्टे महाराजांच्या सुमधुर वाणीने आणि भगवान शिवाच्या नामजपाणे मंत्रमुग्ध झालेल्या भाविकांचे दृश्य पाहायला मिळते. प्रसंगी संस्थानाच्या महंत राधताई सानप आईसाहेब  यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

No comments:

Post a Comment