तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

आवडीत प्रगती केली तर भविष्य उज्वल-दिवेकर
प्रतिनिधी
पाथरी:-खेळ कोणताही असो त्यात आवड असेल आणि प्रामाणिक पणे मेहनत केली तर प्रगती निश्चित होते असे प्रतिपादन पाथरी न प चे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर यांनी येथिल साई क्रिडा मंडळाच्या खेळाडू समोर सदिच्छा भेटी दरम्यान बोलतांना व्यक्त केले.
या वेळी जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात, मंडळाचे अध्यक्ष भारत धनले,पत्रकार किरण घुंबरे पाटील यांची उपस्थिती होती. या वेळी या ठिकाणी असलेल्या खेळाडूं साठी सार्वजनिक सैचालयाची लवकरच व्यवस्था करून खेळाडूंच्या स्वच्छतेची समस्या सोडवणार असल्याचे दिवेकर यांनी सांगितले. या वेळी साई क्रिडा मंडळाच्या वतिने दिवेकर यांचा सत्कार करण्यात आला. तर शासनाच्या वतीने सदाशिव थोरात यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाल्या बद्दल मुख्याधिकारी दिवेकर यांच्या हस्ते साई क्रिडा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी सदाशिव थोरात यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साई क्रिडा मंडळाचे अध्यक्ष भारत धनले यांनि केले तर सुत्र संचलन आणि आभार संदिप धनले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितते साठी सतिष काळदाते, भिमराव तारे, शिवम चव्हाण, हारकाळ यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment