तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 February 2019

ना. धनंजय मुंडेंच्या मागणीला यश; दिव्यांगास वातानुकूलीत शिवशाही बसमध्ये ७० टक्के तर साथीदारास मिळणार ४५ टक्के सवलत- डाॅ. संतोष मुंडेंची माहितीपरळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :- दि.७

एसटी महामंडळाच्या वातानुकूलीत शिवशाही बसेसमध्ये आता दिव्यांग (अंध, अपंग व्यक्ती) आणि त्यांच्या साथीदारास प्रवासभाडे सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. मागील वर्षी ३ जून २०१६ रोजी "दिव्यांगांना भाड्यात सवलत मिळावी तसेच त्यांना काही जागा आरक्षित असाव्यात" या मागणीसाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची भेट घेतली होती तसेच याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर नुकतीच याबाबत परिवहन मंत्री रावतेंनी केलेल्या घोषणेचे स्वागत करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडेंनी शासनाचे इतर विभागही दिव्यांगांचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

शिवशाही (आसन व्यवस्था) बसमध्ये आता दिव्यांग व्यक्तीस प्रवास भाड्यात ७० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या साथीदारास प्रवास भाड्यात ४५ टक्के इतकी सवलत देण्यात येणार आहे. 

दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ व सन २०१६ चा सुधारित कायदा (आर. पी. डब्लू. डी.) केंद्र व राज्य सरकार राबवित आहे. या कायद्यान्वये महाराष्ट्रातील सुमारे २९ लाख दिव्यांग व्यक्तींना फायदा होऊ शकतो.

महामंडळामार्फत अंध आणि अपंगांना सध्या साध्या आणि निमआराम बसमधून प्रवासासाठी ७५ टक्के सवलत देण्यात येते. याशिवाय त्यांच्या साथीदारास साध्या व निमआराम बसमधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत देण्यात येते. आता या प्रवास भाडे सवलत योजनेत वातानुकूलीत शिवशाही (आसन व्यवस्था) बसचाही समावेश करण्यात आला आहे. आता त्यांना शिवशाही बसमधून प्रवासभाडे सवलत मिळणार असल्याने शासनाच्या या निर्णयाबाबत डॉ. मुंडेंनी समाधान व्यक्त करत तसेच यापुढेही राष्ट्रवादी युवक काँग्रेस दिव्यांगांच्या सदैव पाठीशी राहील याची ग्वाही दिली.

2 comments: