तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 February 2019

पाथरीत शिवजयंती निमित्त हिंदु-मुस्लिम आंतरजातिय विवाहाने समाजापुढे ठेवला नवा आदर्श


किरण घुंबरे पाटील
पाथरी:-येथिल ओंकार सेवाभावी संस्था, पुणे येथील सह धर्मदाय आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पाथरी-मानवत  राष्ट्रीय महामार्गा लगत शिवजन्मोत्सवा निमित्त झालेल्या विवाह सोहळ्यात अपंग असलेल्या हिंदू मुलगा आणि मुस्लीम मुलीचे लग्न   झाल्याने छत्रपती शिवराय मंदिरा सोबत मसजिद बांधत होते हा इतिहास ताजा झाल्याची भावना उपस्थित व्यक्त करत होते.
डॉ जगदिश शिंदे यांच्या पुढाकारातून शिवजयंती चे आैचित्य साधून पाथरी शहरात सर्वधर्मिय सामुदाईक विवाह सोहळ्याचे आयेजन केले होते.यात अठरा हिंदू ,दोन बौद्ध आणि सात विवाह मुस्लिम विवाह पद्धतीने संपन्न झाले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथिल सह धर्मदाय आयुक्त देशमुख यांची उपस्थिती होती तर  आ राहूल पाटील, माजी आ हरिभाऊ लहाने, मेघनाताई बोर्डीकर, जि प चे माजी सभापती दादासाहेब टेंगसे , शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त सदाशिव थोरात आणि मान्यवरांची ऊपस्थिती होती. या आंतरजातिय विवाहाची चर्चा या सर्वधर्मिय विवाह सोहळ्यात होतांना दिसत होती.धर्माच्या जातीच्या चौकटी तोडत या दोन्ही कुटूंबांनी निर्णय घेत हा विवाह पार पाडल्याने उपस्थितांनी या दोन्ही कुटूंबाचे कौतूक करत या नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद दिले.अतिषय शिस्त आणि नियोजन बद्ध पार पडलेल्या या विवाह सोहळ्या साठी हजारोंच्या संखेत नागरीकांची ऊपस्थिती होती.

संकल्प राष्ट्र उभारणी ग्रुपची मुस्लिम कुटूंबाला मशिन भेट 

विविध स्तरातील मंडळी एकत्र येत संकल्प राष्ट्र उभारणी ग्रुप ची स्थापना करून राष्ट्र पुरूषांच्या जयंतीचे औचित्य साधून गरीब,गरजूंना यंत्र भेट देत असतात आता पर्यत १७० जनाना मदत केलेल्या या ग्रुप ने पाथरी शहरातील बेकार मोहल्यातील अतिषय गरीब असलेल्या मुस्लिम महिलेला पापड तयार करण्याचे यंत्र आणि शिलाई मशिन देऊन शिवजन्मोत्सव साजरा केला. अशा प्रकारे सर्वधर्म समभावाची शिकवन देत पाथरी शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीने मंगळवारी कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली.

No comments:

Post a comment