तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे संस्थाभेटी अभ्यास दौऱ्याचे आयोजन
विद्यार्थी घेणार संस्थेची विविध माहिती 

विविध माहिती घेवून करणार प्रदर्शन 

फुलचंद भगत(जिल्हा प्रतिनिधी)

वाशिम - स्थानिक येथील सरस्वती समाजकार्य महा विद्यालय वाशिम च्या वतीने एम .एस .डब्लू .भाग दोन च्या विद्यार्थी यांना चौथ्या सेमिस्टर साठी संस्था भेटी करून माहिती घेणे व ती माहिती अमरावती बोर्डाच्या नियमानुसार  प्रदर्शित करणे अनिवार्य असल्याने येथील विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले आहेत .हे विद्यार्थी तब्बल 6 दिवस येथे निवासी राहून दिनांक 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी पर्यंत विविध क्षेत्रात कार्यरत व अभ्यासात असणाऱ्या संस्था ची माहिती प्रमुख मार्गदर्शक प्रा .पि .एन .संधानी यांच्या मार्गदर्शनाखाली घेणार आहेत .यामध्ये क्रुषि , महिला , युवक , शेतकरी , बालक , आदर्श गांव , वंचित जमात , आरोग्य ,  बेरोजगार , मागासलेला भाग ,  काराग्रूह , महिला आर्थिक विकास महामंडळ, समुपदेशन केंद्र , बालनिवारण समिती , जिल्हा सामान्य रुग्णालय ,ईत्यादि अनेक क्षेत्रात कामं करणाऱ्या संस्थाना भेटी देणार असल्याची माहिती विद्यार्थी प्रविण पट्टेबहादूर यांनी दिली आहे .यावेळी विद्यार्थी अंकुश ढेले , सूरज जयस्वाल , साईनाथ वाघमारे , अमोल चव्हाण , ओम सानप , नितीन केतने, निलेश राठोड , कु मंगल शिरसाठ , कु दैवता चाटसे आदी विद्यार्थी प्रमुख मार्गदर्शक  प्रा .पि .एन .संधानी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणार असल्याची माहिती विद्यार्थी प्रविण पट्टेबहादूर यांनी दिली आहे .

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment