तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 10 February 2019

आरोग्य हॉस्पिटल व अ‍ॅडव्हान्सड् लॅप्रोस्कोपी सेंटरचे आज ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी शहरात अद्यावत साधन सामुग्रीने सज्ज असलेल्या आरोग्य हॉस्पिटल व अ‍ॅडव्हान्सड् लॅप्रोस्कोपी सेंटरचा शुभारंभ आज दि.10 फेब्रुवारी रोजी सायं 5 वाजता विधान परिषद विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होत आहे. 
अनुसया कॉम्प्लेक्स भगवानबाबा चौक, जलालपूर रोड येथे नव्याने सुरु होत असलेल्या या हॉस्पीटल शुभारंभाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिक्षक डॉ.रामेश्‍वर  लटपटे तर प्रमुख अतिथी म्हणून ता.आरोग्य अधिकारी डॉ.बालासाहेब लोमटे, जनरल सर्जन डॉ.हरिश्‍चंद्र वंगे, डॉ.राजाराम मुंडे, रा.काँ.प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, जालना हॉस्पिटलचे डॉ.प्रदिप हुशे, वैष्णवी हॉस्पिटल लातूरचे डॉ.राजेश दरडे, जालना हॉस्पिटलचे डॉ.आनंद बोरीवाले, डॉ.विवेक केंद्रे, युवा नेते निळकंठ चाटे, जालना हॉस्पिटलच्या डॉ.अंजली हुशे यांची उपस्थिती राहणार असून या बरोबरच या हॉस्पिटलच्या शुभारंभानंतर आरोग्य मेडिकल व जनरल स्टोअर्सचा शुभारंभ होणार असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रघुनाथ अर्जुन मुंडे, अंगद अर्जुन मुंडे, गोविंद रघुनाथ मुंडे, संजय महादेव फड व हॉस्पिटलचे संचालक डॉ.संतोष रघुनाथ मुंडे, डॉ.प्रज्ञा संतोष मुंडे (ढाकणे) यांनी केले आहे.

No comments:

Post a comment