तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या कुटुंबाच्या आरोग्य सुरक्षेसाठी सात्यकीने प्रयत्न करणार- डाॅ निलेश दळवे

अरुणा शर्मा


पालम :- ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या कुटुंबात आर्थिक प्रश्न गंभीर आहेत व त्यामुळे आरोग्याचा प्रश्न सातत्याने भेडसावणारा असल्यामुळे पालम तालुक्यांतील संपुर्ण शेतकर्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे आरोग्या सुरक्षा देण्यासाठी कायमस्वरुपी प्रयत्न करणार असल्याचे मत जगदंब हाॅस्पिटल चे डाॅ. निलेश दळवे यांनी सांगितले. ते पालम तालुक्यातील डिग्रस येथे जि.प.प्रा.शाळा येथे महीला व बालरोग शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुक्मिणबाई कुरे, डाॅ. योगिता दळवे, मुख्याध्यापक रणजित सागावे, सचिन गायकवाड, चांदमारे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी डाॅ. दळवे पुढे बोलताना म्हणाले कि, ग्रामीण भागातील सामान्य शेतकर्यांच्या कुटुंबात कर्जबाजारीपणा, नापीकी, अस्ताना व सुलतानी संकटाने शेतकरी कोलमडून पडला आहे. आर्थिक परीस्थिती चांगली नसल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवतात त्यात स्रियांचे आजार व्यसनाधिनता त्यामुळे रोगांचे प्रमाण वाढते. त्यासाठी प्रत्येक ग्रामीण भागातील महिलांची काळजी घेणे गरजेचे आहे. महिलांची स्व:ताच्या मुलाबाळासह कुटुंबाची काळजी घ्यावा रोग झाल्यावरच ईलाज करण्यापेक्षा न होण्यासाठी प्रयत्नवादी व्हावे या शिबिरात जवळपास १२० महिलांची ७० पालकांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात जगदंब परीवाराच्या वतिने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वसुंधरा मोरे यांनी केले. तर आभार सिद्धार्थ खंदारे यांनी मानले. यशश्वीतेसाठी अनुराधा कुलकर्णी, आशा लावंड, अमोल दीक्षित, संतोष बुके आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील महिलांची लक्षणिक उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment