तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 February 2019

ना. पंकजाताई मुंडे यांचे मराठा आरक्षणात मोलाचे योगदान - आ. नरेंद्र पाटील

यशःश्री निवासस्थानी भाजपा कार्यकर्त्यांनी केले उत्स्फूर्त स्वागत

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. ०५ ----- मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी मोलाची भूमिका बजावली होती, त्यांनी वेळोवेळी यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करून समाजाला न्याय मिळवून दिला आहे असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील यांनी येथे केले. 

   अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या शासकीय बैठकीसाठी आ. पाटील आज परळीत आले होते. भाजपच्या वतीने ना. पंकजाताई मुंडे यांच्या यशःश्री निवासस्थानी त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की,  लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी  नेहमीच मराठा समाजाच्या प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही होते, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ना. पंकजाताई मुंडे हया देखील समाजाच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिल्या. परळी येथे आरक्षणाच्या आंदोलनात स्वतः सहभागी होवून या आमच्या बहिणीने तमाम बांधवांना विश्वास दिला आणि म्हणून आंदोलन मागे घेतले गेले. आज त्यांच्या भूमिकेमुळे आरक्षणाचा प्रश्न सुटला. सरकारने महामंडळाच्या माध्यमातून केवळ मराठाच नाही तर समाजातील सर्व  तरूणांसाठी कर्ज योजना आखली आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. 

   प्रारंभी ना. पंकजाताई मुंडे यांच्या वतीने आ. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जीवराज ढाकणे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सुरेश माने, प. स. सदस्य मोहन आचार्य, भरत सोनवणे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सुधाकर पौळ, रविंद्र कांदे, प्रल्हाद सुरवसे, केदार देशमुख, धनंजय कराळे, ज्ञानोबा साबळे, अजय गिते, प्रदीप रासवे, माणिक सातभाई, राजेंद्र ओझा, नरेश पिंपळे, बंडू कोरे, धनराज कुरील, प्रवीण शिंदे, बाळासाहेब देशमुख, बंडू लांडगे, सचिन मस्के, प्रशांत कदम, अमोल घोडके, आदींसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment