तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

हनुमंतगाव येथे पोखरा प्रकल्पांतर्गत झालेल्या कामाची जिल्हा कृषी अधीक्षक औरंगाबाद यांच्याकडून पाहणी.....गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

वैजापूर तालुक्यातील हनुमंतगाव येथे जिल्हा कृषी अधिकारी मोटे यांनी भेट दिली या भेटीवेळी त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत झालेल्या कामाचा आढावा घेतला. त्यामध्ये शेततळे खोदकाम व अस्तरीकरण,फळबाग लागवड, ठिबक सिंचन, तुषार सिंचन इत्यादी चा समावेश होता. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांशी संपर्क साधला व प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल विचारणा केली, यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी देशमुख, तालुका कृषी अधिकारी कुलकर्णी, मंडळ कृषी अधिकारी बोराडे, कृषी सहाय्यक दिपक कुचेकर ,समूह सहाय्यक सागर बोऱ्हाडे व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment