तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 February 2019

नरेगा अंतर्गत सिंचन विहिरींची कुशल बिले नऊ महिण्या पासून थकले;शेतक-यांचा सामुदाईक आत्महात्येचा इशारा


किरण घुंबरे पाटील
पाथरी:-महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत सन 217-18 या वर्षात विहिरींचे खोदकाम करून बांधकाम पुर्ण  करुन ही गेली नऊ महिण्या पासून कुशल बिलाची रक्कम मिळत नसल्याने तालुक्यातील दुष्काळी संकटाचा सामना करणा-या 72 शेतक-यांनी एकत्र येत आठ दिवसात बिले द्या अन्यथा सामुदाईक आत्महात्या करण्याचा इशारा तहसिलदार यांना निवेदना व्दारे दिला आहे.
या विषयी पाथरीचे तहसिलदार, उपविभागिय अधिकारी आणि पं स च्या गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन त्यात म्हटले आहे की, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत सन 217-18 या वर्षात विहिरींचे खोदकाम करून बांधकाम पुर्ण केले असुन विहिरीच्या बांधकामाला नऊ महिने पुर्ण झाले आहेत. दुष्काळात खरीप आणि रब्बी हे दोन्ही हंगाम हातचे गेले आहेत. या कामा साठी उधारी उसनवारी करून विहिरींचे बांधकाम केल्याने देणे दारांचा ससेमिरा या शेतक-यांच्या पाठी मागे लागला आहे. या योजनेतीत तालुक्यातील 72 शेतकरी पैसे मिळत नसल्याने अक्षऱश: वैतागले असुन या साठीच्या कुशल बिलाची रक्कम आठ दिवसात बँक खातत्यात जमा करावी अन्यथा सामुदाईक आत्महात्या करण्याचा इशारा या शेतक-यांनी दिला असुन या दरम्यात 72 शेतक-यांच्या कुटूंबातील एखाद्या सदस्याने जर आत्महात्या केली तर याला शासन जबाबदार राहील असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर आबासाहेब कोल्हे, आन्सीराम सवने, गंगुबाई भोसले, आसाराम भोसले, मदलसा भोसले, मंडूबाई कोल्हे, गंगाधर जाधव, दत्ता भोसले, अमोल आमले, सुमनबाई आमले, दगडू आमले, आसराबाई डूकरे, नानासाहेब डूकरे, सुभाष गलबे,बन्सीधर शिंदे, आदी शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत.

No comments:

Post a Comment