तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 28 February 2019

किंगसन ग्लोबल शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा


सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. २८ __ यावेळी शाळेचे संचालक श्री.श्याम चाळक सर यांच्या हस्ते भारताला पहिला नोबेल पुरस्कार मिळवून देणारा विज्ञान आविष्कार चंद्रशेखर व्यंकट रमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. गेवराई शहरातील किंगसन ग्लोबल स्कूल गेवराई मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. 
        यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चाळक सर यांनी विज्ञानाच्या अभ्यासातून काहीतरी शिकून त्याचा रोजच्या जीवनात अंमल करणे म्हणजे खऱ्या अर्थाने विज्ञान युगात जगणे होय. विज्ञान म्हणजे केवळ शाळेतील शिक्षकांचे प्रयोगवहीतील शेरे नव्हेत किंवा परीक्षेत मार्क मिळवण्याचा सोपा मार्ग नव्हे. विज्ञानाच्या अभ्यासातून काहीतरी शिकून त्याचा रोजच्या जीवनात अंमल करणे म्हणजे खऱ्या अर्थाने विज्ञान युगात जगणे होय. 'राष्ट्रीय विज्ञान दिना'च्या निमित्ताने विज्ञानाच्या वापरातून स्वतःचे आयुष्य सुखकर करणे होय. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना जेव्हा पुढे आली तेव्हा सरकारने त्या वेळचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. वसंतराव गोवारीकरांकडे यासाठी सुयोग्य दिवस कोणता याची चौकशी केली. डॉ. गोवारीकरांनी कोणाचा जन्मदिन-मृत्युदिन न निवडता भारताला पहिला नोबेल पुरस्कार मिळवून देणारा विज्ञान आविष्कार ज्या दिवशी सर चंद्रशेखर व्यंकट रामनांनी जगासमोर मांडला तो दिवस निवडला तोच तो आजचा विज्ञान दिन २८ फेब्रुवारी असे प्रतिपादन श्री. श्याम चाळक सर यांनी केले. 
    कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती दुर्गा पारीख  यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रीमती कुलकर्णी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment