तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

गेवराई येथील वकील संघाचा आंदोलनाला पाठिंबा !सुभाष मुळे..
---------------
गेवराई,दि. १३ __ भारतीय वकील परीषदेने देशभर पुकारलेल्या आंदोलनास गेवराई वकील संघाने पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.
    भारतीय वकील परीषदेने आपल्या विविध मागण्यांसाठी आज देशव्यापी आंदोलन करताना वकील बांधवांसाठी कल्याणकारी योजनांची मागणी केली, यात वकीलांसाठी मेडिक्लेम, वकील संघात चेंबर, पुरेशी ईमारत, सुसज्ज ग्रंथालय, इंटरनेटची सुविधा, स्वच्छतागृह, महिला वकीलांसाठी बसण्याची व स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी, नविन वकीलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन, वृद्ध वकीलांना पेन्शन, माफक दरात भूखंड ईत्यादी कल्याणकारी योजनांसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पाच हजार कोटींची तरतुद करावी अशा आशयाचे निवेदन गेवराई वकील संघाचे अध्यक्ष ॲड. कमलाकर देशमुख, सचिव ॲड. प्रदीप मडके, कोषाध्यक्ष ॲड. ईश्वर धापसे, महिला प्रतिनिधी ॲड. रोहिणी पवार, ॲड. पट्टे, ॲड. बहीर, ॲड. जयस्वाल. ॲड. राठोड, ॲड. भामरे यांच्यासह अनेक वकीलांनी प्रभारी तहसीलदार अभय जोशी यांना निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने वकील हजर होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment