तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 February 2019

आरपीआयचे युवा कार्यकर्ते गोरख सौंदरमल यांचे निधनसुभाष मुळे..
---------------
गेवराई दि. ८ ( वार्ताहर ) येथील रिपब्लिकन पक्षाचे युवा कार्यकर्ते गोरख बुवाजी सौंदरमल ( ४२ ) यांचे शुक्रवार दि. ८ रोजी दुपारी तीन वाजता उपजिल्हा रुग्णालयात 
उपचार दरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. माजी नगराध्यक्ष विनोद सौंदरमल यांचे ते बंधू होत. 
     गोरख सौंदरमल यांचा दलित चळवळीत सक्रिय सहभाग होता. रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनात भूमिका घेतली होती.  शुक्रवारी दुपारी त्यांच्या निधनाची वार्ता समजल्यावर विविध क्षेत्रातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. दुखद घटनेने रूग्णालय परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ८ वाजता भीमनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वकील, पत्रकार व समाजबांधव उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment