तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 February 2019

मंगरुळपीर येथे जागतिक सुर्य नमस्कार दिन साजरा


राष्ट्रीय समाज सेवा समितीचा उपक्रम

फुलचंद भगत(जिल्हा प्रतिनिधि)

मंगरुळपीर-येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात
राष्ट्रीय समाज सेवा समितिच्या वतीने जागतिक सुर्य नमस्कार दिनाचे औचित्य 
साधुन रथ सप्तमी दि.१२ फेब्रुवारी
रोजी सुर्य नमस्कार महायज्ञ कार्यक्रम
उत्साहात पार पडला.
रथ सप्तमीचे  दिवशी सकाळी ७वाजता
जागतिक सुर्यनमस्कार दिना निमित्स
शाळेच्या मैदानात स्वछता अभियाण
राबवुन परिसराची साफसफाइ झाल्या
नंतर सुंदर रांगोळी व फुलांनी परिसर सजविण्यात आला.त्यानंतर नमस्कार महायज्ञ कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.या समिती च्या वतीने विविध उपक्रम
राबविण्यात येत असतात.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणुन समितीचे
कार्यकर्ते संजय टोंचर यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी टोंचर यांनी सुर्य नमस्काराचे बारा
नावाची माहीती दिली
त्या वेळी टोंचर माहीती देतांना सांगितले की
आपल्याला स्वस्थ राहण्याची इच्छा असते पण त्याच्यासाठी वेळ कमी पडते ह्या परिस्थितीवर मात करायची असेल तर त्याचं सुर्यनमस्कार,जो १२ योगासनाचा संच आहे,जो तुमच्या ह्र्द्य आणि रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता राखू शकतो.सूर्यनमस्काराची आसने केल्याने तुमच्या शरीराला डौल येतो आणि मन शांत रहाते.
सूर्यनमस्कार करण्यासाठी उत्तम वेळ सकाळी,रिकाम्या पोटी.या साध्या आणि प्रभावी सूर्यनमस्कारांने आपण
स्वस्थ जीवनाची सुरुवात करूया.
प्रत्येक सूर्यनमस्कार हा दोन सूर्यनमस्कारांचा संच असतो.ही १२ आसने म्हणजे अर्धा सूर्यनमस्कार,आणि दुसरा अर्धा भाग म्हणजे ह्याच १२ आसनांची अनुक्रमाची पुनरावृत्ती करणे.फक्त डाव्या पाया ऐवजी उजवा पाय पुढे आणणे.( खाली चौथ्या आणि नवव्या क्रमामध्ये सांगितल्याप्रमाणे).तुम्हाला सूर्यनमस्काराचे विविध प्रकार दिसतील.पण एकाच पद्धतीच्या अनुक्रमाचा अभ्यास केल्याने त्याचे जास्त फायदे होतात असेही
सांगीतले.
या कार्यक्रमास  न.प.उपाध्यक्ष प्रा.विरेंद्रसिंह
ठाकुर,बाजीराव निंबेकर,मनोहर काळे,तेजस 
कांत,नायसे,नंदु पुरोहीत प्रभु,हरिहर राउत,
रामदास सुर्वे यांचे सह शेकडो नागरिकांनी
सुर्यनमस्कार काढले.कार्यक्रमाचे संचालन
राष्ट्रीय समाज सेवा समितीचे कार्यकर्ते देवानंद राठोड यांनी तर आभार सुधाकर
क्षीरसागर यांनी मानले
चहा व नाश्त्याच्या कार्यक्रमाने सांगता
करण्यात आली.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a comment