तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 February 2019

कम्युनिटी डेव्हलपमेंट योजनेचे गढी येथे प्रमाणपत्र वितरण


सुभाष मुळे..
---------------
     गेवराई, दि. ८ __:(प्रतिनिधी) औषध निर्माण शास्ञ संस्थे अंतर्गत कम्युनिटी डेव्हलपमेंट योजना राबविण्यात येते. या योजनेचे वेगवेगळ्या झालेल्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. ही योजना कौशल्य विकास आणि उद्योजकता मंञालय, (भारत सरकार) नवी दिल्ली या विभागा अंतर्गत चालवली जाते.
     औषध निर्माणशास्ञ संस्थेचे प्राचार्य श्री. बोरुडे एस. व्ही. यांनी मार्गदर्शन केले की, कम्युनिटी डेव्हलपमेंट या योजने अंतर्गत समाजाच्या गरजा ओळखण्यासाठी विविध प्रकारचे सर्वेक्षण केले जातात तसेच समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करणे जेणे करून त्याचे श्रम कमी होईल व जिवनमान सुधारेल  तसे समाजातील गरजूंना त्याच्या गरजेनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून देणे व त्यांना रोजगार, स्वंयरोजगार करण्या इतपत सक्षम करणे असे प्रतिपादन केले. गढी येथे मुख्य केंद्राच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. प्राचार्य श्री. बोरुडे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.श्री. नारनवरे सर हे होते. प्रा. श्री. गांधी सर ( अंतर्गत समन्वयक), श्री जाधव सर, सल्लागार पवार, प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रा. श्री. गांधी सर यांनी मार्गदर्शन करतांना भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंञालय विभागाकडून कम्युनिटी डेव्हलपमेंट योजनेतुन विविध कोर्स उपलब्ध आहेत. स्थानिक पातळीवरील मागणीनुसार या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुख्य केंद्र गढी व उपकेंद्रे  गेवराई, लुखामसला , तलवाडा, चकलांबा व सिरस मार्ग इत्यादी केंद्रावर विविध कोर्सच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार व शाळाबाह्य विद्यार्थ्यांना कौशल्य विकासीत करुन त्यांना वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
     कम्युनिटी डेव्हलपमेंट योजनेचे अध्यक्ष माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या दुरदृष्टी नेतृत्व व त्यांच्या अथक प्रयत्नांतुन ही योजना संस्थेला मंजुर केलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही योजना औषध निर्माणशास्ञ संस्थेत यशस्वीरित्या राबवली जात आहे. यामध्ये काॅम्प्युटर कोर्स, बेसिक फिटींग वर्क व शिट मेटल वर्क, फॅब्रीकेशन, डिजीटल फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी असे विविध कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते तसेच प्रशिक्षण घेऊन स्वत: चा स्वंयरोजगार उपलब्ध होण्यास मदत होते असे प्रतिपादन प्रा. श्री. गांधी डी.आर यांनी केले. करीता औषध निर्माणशास्ञ संस्था शिवाजीनगर गढी येथे कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रो पाॅलिटेक्निक या योजनेच्या प्रशिक्षणाचा  सर्व लाभार्थ्यांंनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेकडुन करण्यात येत आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment