तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

चांदापुर मार्गे घाटनांदुर रस्ता दुरुस्तीला मुहुर्त मिळणार का? कामाविनाच रस्ता निधी हडप करण्याचा गुत्तेदाराचा डाव


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- तालुक्यतील प्रत्येक रस्त्याला लाखों रुपयांचा निधी मंजुर केल्याच्या घोषणा ह्या केवळ पोकळ घोषणा असल्याचे अनुभवायला मिळत आहे. एक वर्षापुर्वी परळी चांदापुर-घाटनांदुर या रस्त्यासाठी 75 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. परंतु संबंधित गुत्तेदार हा त्याच पक्षाचा पदाधिकारी असल्याने त्या गुत्तेदारास काम सुरु करण्यास मुहुर्त मिळत नसुन हा निधी कागदोपत्री काम केल्याचे दाखवुन हाडप करण्याचा डाव असल्याची संतप्त प्रतिक्रीया नागरिकांतुन दिल्या जात आहेत. तेव्हा हा रस्ता दुरुस्त होणार का ? असा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. 
    पंतप्रधान सडक योजना किंवा खासदार, किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना , आमदार फंडातुन परळी तालुक्यातील संपुर्ण रस्ते दुरुस्त करण्यासाठी लाखोत नव्हे तर कोटीमध्ये निधी आनला जात असल्याच्या घोषणा आणि गर्जना प्रत्येक सभेतुन केल्या जात असतानाच परळी-चांदापुर-घाटनांदुर, परळी नदागौळ-पुस हे लातुर जिल्ह्याला जोडणारे  महत्त्वाचे रस्ते आहेत. या रस्त्यामुळे परळीकरांना लातुर जिल्ह्यात आवक जावक करण्साठी सोपे जाते आणि त्यातच परळी अंबाजोगाई रस्याची वाट ूलागल्यामुळे या दोन्ही रत्यांवर मोठी वाहतुक होतांना दिसत आहे. परंतु हे दोन्ही रस्ते मागील अनेक वर्षापासुन दयनीय अवस्थेत असल्यामुळे या रस्त्यारुन प्रवास करत असतांना मोठी कसरत करावी लागत आहे. या दोन्ही रस्त्यांवर विविध योजनेतुन अनेक वेळा लाखों रुपयांचा निूी टाकला जातो परंतु काम मात्र होत नाही. काम करणारे गुत्तेदार हे राजकीय पुढार्‍यांचे जवळचे नातेवाईक असल्यामुळे या गुत्तेदारांकडुन संबंधित अधिकार्‍यांवर राजकीय दबाव आणुण काम झाल्याचे कागदोपत्री दाखवुन मोठा अपहार केला जातो ज्या अधिकार्‍यांनी सह्या केल्या नाहीत त्या अधिकार्‍यांचे अपहरण ही केल्याच्या घटना यापुर्वी घडल्या आहेत. आता या दोन्ही रस्त्यांवर एक वर्षापुर्वीच लाखों रुपयांचा निधी मंजुर केला आहे. संबंधित गुत्तेदाराकडुन खडीचे ढिगारे ही टाकले आहेत. परंतु हे ढिगारे आता हळुहळु गायब होवु लागल्याने हा रस्ता दुरुस्त होणार की नाही असा प्रश्न नागरिकांमध्ये होत आहे. याचाच अर्थ रस्ते कामाबाबत केवळ बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात हीच परिस्थिती राहणार असल्याचे दिसुन येत आहे.

No comments:

Post a Comment