तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 February 2019

सिध्दार्थ नगर मधील पाणी प्रश्न गंभीरलवकरात लवकर उपाय योजना नाही केल्यास तिव्र आंदोलन-गोविंद चौरे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) (दि.१३) :-
            मागील काही दिवसांपासून सिध्दार्थ नगर येथील नागरीक पाण्यासाठी वणवण फिरताना दिसता आहेत ऐन दुष्काळात देखील नगर परिषद त्यावर गांभीर्याने विचार करायला तयार नाही उलट परळी शहरात पाणी पुरवठा पाईप लाईन टाकून पाणी पुरवठा सुरळीत आहे अस दाखवण्या मध्ये व्यस्त आहे परंतू परळी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा सभापती ना याना कदाचित माहीत नसावे की शहरातील सिध्दार्थ नगर येथे साधी पाईप लाईन देखील टाकलेली नाही ऊलट जूनी पाईप लाईन असून त्याला कधी पाणी येत नाही.
          याबद्दल वारंवार सांगून देखील नगर परिषद याकडे दुर्लक्ष करत आहे या भागातील नगर सेवक तर शोधून पण सापडत नाहीत या सर्व गोष्टींना कंटाळून आज सिध्दार्थ नगर येथील महिला शिष्टमंडळ नगर परिषद मध्ये गेले असता नेहमी प्रमाणे आज पण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच पाणी पुरवठा सभापती नागरिकांच्या समस्या ऐकून घ्यायला ऊपलब्ध नव्हते मग निवेदन न देता उपनगराध्यक्ष यांच्या कडे जावुन समस्या सांगीतल्या व लवकरात लवकर त्यावर उपाय योजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा भाजपचे युवा नेते गोविंद चौरे यांनी दिला.
      यावेळी भाजपाचे सुभाष सावंत,अनिल कांबळे,किशोर बहादूरे, राम मुंडे व सर्व कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment