तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

सुनील दाणे यांचेकडून टाकळी वा. शाळेस दोन संगणक भेट


----------------------------------
मोताळा :- (तालुका प्रतिनिधी ) *ISO मानांकित जि.प.शाळा टाकळी वाघजाळ या शाळेस स्व. यमुनाबाई मधुकर दाणे यांच्या स्मुर्तीप्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र मा.सुनील मधुकर दाणे यांनी दोन संगणक भेट दिले आहे.*
       *टाकळी शाळेत कार्यरत असलेल्या संगिता जवरे पाटील यांचे ते भाऊ असून शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक ज्ञानासाठी संगणकाची खूप गरज आहे त्यामुळे संगणक देण्याची विनंती केली आणि बहिणीची विनंती तात्काळ मान्य करून मा.सुनीलभाऊ यांनी शाळेला दोन संगणक दिले.*
       टाकळी वाघजाळ ही शाळा आपल्या गुणवत्तेसाठी जिल्हाभर ओळखली जाते मिळालेल्या संगणकांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल.मा.सुनीलभाऊ यांनी वंचित तथा उपेक्षित घटकातील मुलांना ज्ञानाचे नवीन दालन उघडून दिल्याबद्दल त्यांचे शा.व्य. स.,ग्रा.पं. पदाधिकारी,मु.अ.शिक्षक, विद्यार्थी यांनी त्यांचे मनापासून कौतुक करून आभार मानले.*
      *शाळेत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मा.संगीता जवरे पाटील यांच्या हस्ते दोन्ही संगणकाचे लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी शाळेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी अशोक राजनकर मु.अ. वर्षा राजनकर स.अ. विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment