तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 February 2019

जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सार्वजनिक शिवजन्मोत्सवा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजनमराठा- बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मराठा सेवा संघप्रणीत जिजाऊ ब्रिगेड संघटनेच्यावतीने बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण,रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  दि.17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2019 दरम्यान वक्तृत्व स्पर्धा, पाककला, रांगोळी, खेळ पैठणीचा, व्याख्यान, बक्षीस वितरण,भव्य शोभायात्रा, आदी सामाजिक, सांस्कृतिक, लोकोपयोगी अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ तमाम मराठा बहुजन बांधवांना घ्यावा असे आवाहन मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, तानुबाई बिर्जे पत्रकार कक्ष,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, संगीतसूर्य केशवराव भोसले कक्ष, उद्योग कक्ष परळी शाखा आदीच्या वतीने करण्यात आले आहे.

  *वक्तृत्व स्पर्धा*
      दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 ते 5 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनात राष्ट्रमाता जिजाऊ चे महत्व या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन पशुधन विकास अधिकारी परळी शिवमती डॉक्टर रश्मी ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे तर अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष शिल्पाताई दीपक शिंदे यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या  शिल्पाताई अतुल रोडगे, उर्मिलाताई संभाजी आमले, प्रमिलाताई कदम, मंजुषाताई दिलीप जाधव,अनिता संदीप पाटील, रविनाताई प्रकाश भोसले, विद्याताई देवराव लुगडे, मनिषाताई बदाले आदींची उपस्थिती लाभणार आहे.

पाककला स्पर्धा
दरम्यान सायंकाळी 5 ते 8 या वेळेत पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आहे उद्घाटक म्हणून नपच्या स्वच्छता सभापती शिवमती राजश्रीताई धनंजय देशमुख तर अध्यक्षस्थानी  जिजाऊ ब्रिगेडच्या परळी शहराध्यक्ष शिवमती सारिकाताई पांडुरंग यादव तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या राजश्रीताई राजेश देशमुख, निर्मला वानखेडे, देवकन्या विजय लुगडे, रुक्मिणीताई प्रकाश माने, सविताताई माळचिमणे, राधाताई हनुमान इंगळे, ज्योतीताई शिंदे, भाग्यश्री अंकुश जाधव, संगीता सोळंके, आदींची उपस्थिती लाभणार आहे.

रांगोळी स्पर्धा
      दिनांक 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 4  ते 5 वा.   दरम्यान रांगोळी स्पर्धा होणार असून या स्पर्धेचे उद्घाटन महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या शिवमती डॉ. रेखाताई परळीकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कार्याध्यक्ष श्रीमती अनिताताई ठोंबरे, अनुराधाताई मधुसूदन काळे, संगीताताई ससाने सुचिता देशमुख, सुनीताताई सूर्यवंशी आदी उपस्थित राहणार आहेत.

खेळ पैठणीचा
      सायंकाळी 5 ते 8 या वेळेत खेळ पैठणीचा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन एचपी गॅस एजन्सी धारूर संचालिका शिवमती आशा सयाजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या सचिव शिवमती अरुणा प्रकाश लेनेकर तसेच संत तुकाराम गृहनिर्माण संस्थेच्या संचालिका शिवमती ज्योतीताई प्रकाशराव मराठे, मनिषाताई यादव, शुभांगीताई बांदल, पूजाताई पांडुरंग काळे, अश्विनीताई काळे, आदी उपस्थित राहणार आहेत.

छ. शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा व प्रतिमा पूजन तसेच भव्य शोभायात्रा      दिनांक 19 फेब्रुवारी 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम सकाळी 9 वा. तहसीलदार शिवश्री शरद झाडके, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शिवश्री एन. एन.थिटे, जागृती मल्टीस्टेटचे चेअरमन शिवश्री प्रा. गंगाधरराव शेळके, सुज्वल मंगल कार्यालयाचे संचालक शिवश्री संजय सुशिलराव देशमुख, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा  शिवमती शिल्पाताई शिंदे, मराठा सेवा संघाचे परळी तालुका अध्यक्ष शिवश्री अंकुश जाधव, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष शिवश्री अमोल देशमुख, संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा शिवमती पूजाताई पांडुरंग काळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

भव्य शोभायात्रा
    छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा  ते जिजामाता उद्यानापर्यंत भव्य अशी पारंपारिक वेशभूषा परिधान केलेली महिलांची ऐतिहासिक भव्य  शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

व्याख्यान व बक्षीस वितरण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील पराक्रमी महिला या विषयी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते तथा मराठी विषयाचे गाढे अभ्यासक शिवश्री प्रा. अजित जाधव यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष शिवमती शिल्पाताई शिंदे तर स्वागताध्यक्ष मराठा सेवा संघाचे परळी तालुका अध्यक्ष शिवश्री अंकुश जाधव यांच्यासह   मराठा सेवा संघ बीड जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री प्रकाश लेनेकर, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष शिवमती संजीवनीताई सुरवसे,  संगीतसूर्य केशवराव भोसले कक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री संजय सुरवसे, मराठा सेवा संघ बीड जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री. संजय देशमुख, मराठा सेवा संघ परळी तालुका कार्याध्यक्ष शिवश्री. राजेश ठोंबरे, जिजाऊ ब्रिगेड शहराध्यक्ष शिवमती सारिकाताई यादव, मराठा उद्योग कक्षाचे अध्यक्ष विठ्ठलराव साबळे, वधु-वर सुचक कक्षाचे अध्यक्ष शिवश्री मदन नागोराव गरड,  मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष संदीप काळे, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष ग्रामीण नितीन निर्मळ, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष शिवश्री दीपक शिंदे, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे तालुका कार्याध्यक्ष शिवश्री पांडुरंग यादव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जिजामाता उद्यान येथे व्याख्यान व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सकाळी 11 संपन्न होणार आहे.

No comments:

Post a Comment