तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 February 2019

"मैत्रजिवांचे" ग्रुपची जन्मभूमी फाऊंडेशनच्या बंधारा कामाला मदत
प्रतिनिधी
पाथरी:- मराठवाड्या सह राज्याच्या अनेक भागात या वर्षी दुष्काळ असून पाथरी,मानवत तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकरी बांधवांना मागिल चार वर्षा पासून विविध प्रकारे मदत करण्याचे काम सुरू असुन या वर्षी वाघाळा-फुलारवाडी गावचा पाण्याचा प्रश्न सोडवण्या साठी अर्धा किमी अंतराचा बंधारा उभारणी काम सुरू केले असुन या साठी अनिवासी भुमीपुत्र मदत करत असून शनिवारी पुणे स्थित पाथरी तालुक्याचे भुमीपुत्र अभियंते गंगाधर सत्वधर यांच्या "मैत्रजिवांचे" या सामाजिक ग्रुपच्या वतीने या बंधारा कामा साठी दहाहजार रुपयांची अर्थिक मदत दिल्याची माहिती जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात यांनी दिली.
दुष्काळ ही संधी माणुुन जन्मभुमी फाऊंडेशन निवासी , अनिवासी,डॉक्टर, अभियंते, उद्योजक, पत्रकार,अधिकारी, कर्मचारी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मदत करत आहेत. या वर्षी पाथरी तालुक्यात दुष्काळ असून त्यातही वाघाळा आणि परिसरात या वर्षी पन्नास टक्के पेक्षा कमी पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी चिंता असून. या गावच्या सिमेवर जायकवाडी कालव्याचे अतिरीक्त पाणी वाहून जाणा-या सांडव्यावर अर्धा किमी लांबीचा पंधरा ते विस फुट खेलीचा आणि तीस फुट रुंदी असलेल्या बंधा-याचे काम प्रशासनाची अधिकृत परवानगी घेऊन सुरू केले असून या साठी ग्रामस्थांचा लोकवाटा आणि जन्मभूमी फाऊंडेशन संवेदनशिल लोकांची मदत घेत निधी जमा करून हा बंधारा उभारण्याचे काम करत असल्याचे थोरात यांनी सांगितले. जमेल तशी मदत मिळऊन हा बंधारा पुर्ण करून या दोन्ही गावचा पिण्याचा आणि मोठ्या प्रमाणात सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल असे ही थोरात यांनी सांगितले या कामा साठी शनिवारी पुणे येथील "मैत्रजिवांचे या सामाजिक ग्रुप ने दहा हजाराची मदत केली असून. या कामा साठी अजून ही मदत लागणार असून त्या साठी संवेदनशिल माणसांच्या भेटी घेण्यात येत असल्याचे थोरात म्हणाले.

No comments:

Post a Comment