तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 February 2019

गावकरी घेणार जलसंधारण चे धड़ेचार दिवसीय निवासी प्रशिक्षणा तुन जलसंधारण ते मनसंधारण !

प्रशिक्षणासाठी पाणी फाऊंडेशनची पहिली टिम रवाना

फुलचंद भगत(जिल्हा प्रतिनिधी)
मंगरुळपीर : दुष्काळातुन समृद्धीकडे करण्यासाठी स्वताच्या हिंमतीवर गांवकरी जलसंधारण च्या कामाचे धड़े गिरवन्यासाठी  तालुक्यातून पिंप्रि खू , चकवा  , चिंचाळा , उमरी बू , पोटी  , पिंप्रि अवगण , दाभडी , रामगड, गिंभा गावातील 30 पुरुष , 11महिला पाणी फाउंडेशन च्या चार दिवसीय निवासी प्रशिक्षण घेण्यासाठी अमरावती जिल्हा मधील नांदगांव खांडेश्वर  तालुक्यातील पापळ येथे मंगरुळपीर बस स्टॅंड  येथून गुरुवार ला  12 वाजता रवाना झाली यावेळी मंगरुळपीर  तहसील चे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ , नायब तहसीलदार एस जाधव , पंचायत समिती चे कृषि  अधिकारी  प्रल्हाद शेळके , पिप्रि खु येथील के एन सुर्वे  , तालुक्यातील पत्रकार , शिवनी रोड  सरपंच ,   पाणी फाउंडेशन चे तालुका समन्वयक समाधान वानखडे , अतुल तायडे तांत्रिक प्रशिक्षक कल्याणी वडस्कर , तांत्रिक सहायक निलेश भोयरे सामाजिक प्रशिक्षक मयुरी काकड़ हजर होते   बस स्टॅंड मध्ये छोटे खाणी कार्यक्रम घेण्यात आला प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षनार्थीं  च्या एस टी बस चे पूजन तहसीलदार वैशाख वाहुरवाघ , नायब तहसीलदार एस जाधव , कृषि अधिकारी प्रल्हाद शेळके  यांच्या हस्ते करण्यात आले  तेव्हा कार्यक्रमाचे संचालन अतुल तायडे यांनी केले असून प्रस्ताविक समाधान वानखडे यांनी केले दरम्यान वॉटर कप मधे मागील वर्षी जे गांव पानीदार झाले त्यांचे उदाहरण देत ग्रामस्थाना  तालुक्याचे तहसीलदार वाहुरवाघ यांनी प्रशिक्षणार्थीना जलसंधारण च्या कामासाठी मार्गदर्शन केले नंतर
हिरवी झेंडी देऊन टीम ला रवाना केले .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निलेश भोयरे यांनी केले .

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment