तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 February 2019

शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात संकल्पना राबवावी - प्रसाद देशमुखप्रतिनिधी :- महेंद्रकुमार महाजन जैन

छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महापुरुष सहजासहजी घडत नाहीत. काळाच्या क्षितिजावर निर्माण झालेल्या अंधकारमय सामाजिक, धार्मिक, राजकीय परिस्थितीतुनच “शिवाजी” नावाच्या सूर्याचा उदय होत असतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपुर्ण आयुष्य समाजातील अंधकार दुर करण्यासाठी व्यतीत केले.
छत्रपती शिवरायांच्या कार्याच्या महतीमुळे आज शेकडो वर्षांनंतरही शिवजयंती समाजातील सर्व घटक मोठ्या उत्साहात साजरी करत असतात.
सगळीकडे जयंती फक्त औपचारिकता म्हणुन हे   चित्र बदलण्यासाठीच शिवजयंतीच्या एका नव्या संकल्पनेचा जन्म झाला. ती म्हणजे शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात !

शिवजयंतीला चौकाचौकात होणारा गोंगाट कमी करुन आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी शिवजयंती अगदी सणासारखीच आनंदमय वातावरणात सहकुटुंब साजरी करायची. छत्रपती शिवराय घराघरात आले तरच घरामध्ये शिवरायांच्या विचारांचे संस्कार येतील. आपल्या नव्या पिढीला शिवरायांच्या विचारांची ओळख घरातुनच व्हायला हवी. ही यामागची संकल्पना आहे. मागच्या दोन वर्षांपासुन ती राबविली जात आहे.आपणास ही संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख बाप्पू व सारे शिवप्रेमी या संकल्पनेशी आपणास जुळण्याची  विनंती करत आहोत .
 सकाळी लवकर उठुन दारात रांगोळी काढावी. घरावर भगवा झेंडा लावावा. स्वयंपाकघरात गोड अन्नपदार्थ बनवावेत. साखर, पेढे वाटावेत. घरात छोटी-मोठी सजावट करावी. महाराजांची मुर्ती अथवा प्रतिमा ठेवावी. त्यास सहकुटुंब हार किंवा पुष्प, सुमनांजली अर्पण करावी.
घरातील मुलामुलींना आणि मित्रसमुहाला शिवचरित्रावरील पुस्तकं भेट द्यावीत.
तुम्ही जर शिवजयंती निमीत्त आयोजित केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी बाहेर जाणार असाल तर घरच्या इतर सदस्यांना घरात शिवजयंती साजरी करण्यासाठी प्रोत्साहित करावे.
 जमल्यास समाजातील उपेक्षित, गरीब, शोषित, अनाथ अथवा गरजुंना यथाशक्ती मदत करावी.
 सार्वजनिक वृक्षारोपण, स्वच्छता सारखे उपक्रम राबवावेत.
आपण घरी सहकुटुंब साजरी केलेल्या शिवजयंतीचे फोटो #घरोघरी_शिवजयंती हॅशटॅगसह सोशल मिडीयावर अपलोड करावेत.

“  दसरा, दिवाळी जशी आपली संस्कृती
तशीच साजरी करु घरोघरी यंदाची शिवजयंती”
चला, ऐतिहासिक बदलाचे साक्षीदार व्हा. शिवजयंती घराघरात साजरी करुन शिवराय मनामनात पोहचवू यात.

महेंद्रकुमार महाजन जैन
9960292121
9420352121

No comments:

Post a comment