तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 February 2019

मरळवाडीत युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन भाजपा ही लुटारुंची टोळी― प्रा विजय मुंडे

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :- 

भारतीय जनता पार्टी ही लुटारुंची टोळी असून नरेंद्र मोदी व अमित शहा हे टोळीचे मुख्य सूत्रधार असल्याची घणाघाती टीका युवक काँग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष प्रा विजय मुंडे यांनी करून आता तरी जनतेने चोरांच्या टोळी पासून सावध राहावे असे आवाहन केले


      परळी तालुक्यातील मरळवाडी येथेे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  खा अशोकराव चव्हाण  तसेच  काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा  टी पी मुंडे सर  यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली  स्थापन  झालेल्या  युवक काँग्रेसच्या शाखेच्या उद्घाटन सोहळा व चलो पंचायत अभियान राबविण्यात आले त्याप्रसंगी युवक तसेच शेतकऱ्यांच्या समोर ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मरळवाडी चे उपसरपंच व्यंकटराव आंधळे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून बीड  जि प सदस्य प्रदीप भैया मुंडे काँग्रेसचे माजी नगरसेवक पंडित झिंजुर्डे काँग्रेसचे परळी शहर उपाध्यक्ष नितीन शिंदे युवक काँग्रेसचे परळी विधानसभा उपाध्यक्ष ऍड मनोज संकाये युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल कांदे शहराध्यक्ष किशोर जाधव युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस हनुमंत गुट्टे नाथराव फड उद्धव चाटे उपस्थित होते


         अच्छे दिन चे खोटे स्वप्न दाखवून पंतप्रधान मोदींच्या टोळक्याने देशाची सत्ता ताब्यात घेतली व साडेचार वर्षे शेतकरी शेतमजूर व्यापारी कर्मचारी यांना लुटण्याचे काम केले शेतकऱ्यांना देशोधडीला लावले तसेच राज्यातील भाजपाच्या फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना दिलेली फसवी कर्जमाफी अजूनही त्याचा लाभ पूर्ण शेतकऱ्यांना झालेला नाही असा घणाघाती आरोप त्यांनी केला


        मोदी शहा टोळीचे मुख्य सूत्रधार असून आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांच्यापासून सावध राहावे जनकल्याणाचे धोरण राबविणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहावे असे आवाहन त्यांनी केले दरम्यान बीड जि प सदस्य प्रदीप भैय्या मुंडे नितीन शिंदे पंडित झिंजुर्डे आदींची भाषणे झाली त्यांनी त्यांच्या भाषणांमधून केंद्रातील तसेच राज्यातील भाजपाचे ध्येय धोरण कसे शेतकरीविरोधी आहे समाजातील कोणताही घटक साडेचार वर्षाच्या कार्यकाळात सुखी नाही असे त्यांनी सांगितले दरम्यान चलो पंचायत राज अंतर्गत किसान कार्ड व बेरोजगार कार्ड चे वाटप करण्यात आले


         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संदिपान मुंडे यांनी तर आभार प्रदर्शन रुक्षराज आंधळे यांनी केली उपस्थितांचे स्वागत युवक कॉँग्रेस शाखेचे नूतन पदाधिकारी अध्यक्ष आश्रुबा अंकुश आघाव सचिव केशव फड कोषाध्यक्ष दौलत फड उपाध्यक्ष राजाभाऊ आंधळे काशिनाथ आघाव शहाणी का गाव प्रकाश आंधळे बाबासाहेब मस्के संघटक माणिकराव सहसंघटक शेषराव फड सल्लागार संतोष वावळे रामेश्वर फड सदस्य नागनाथ नागरगोजे हरिश्चंद्र वावळे अंबादास हा तांगडे भगवान मस्के भास्कर मस्के


          यावेळी गावातील  नरहरी आघाव मारुती महाराज आंधळे ग्रा प सदस्य दत्तात्रय मस्के राम आंधळे अंतराम आंधळे ज्ञानोबा फड राजाभाऊ आंधळे सुभाष आंधळे वैजनाथ फड दत्तात्रय आघाव बाबुराव फड पंढरीनाथ फड ग्रा प सदस्य श्रीहरी आघाव संतराम आघाव अंकुश आघाव आदीसह गावातील ग्रामस्थ शेतकरी महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment