तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 February 2019

पानी फौंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धासाठी परळी तालुक्यातील नऊ गावचे प्रशिक्षणार्थी रवाना ;


 जलसंधारण ते मनसंधारण प्रशिक्षण 2019 ची पहिली तुकडी घेऊन निघालेल्या लाल परीला  नायब तहसीलदार सदानंद बरदाळे यांनी दाखवला हिरवा झेंडा

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
   तालुका परळी जिल्हा बीड
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2019 च्या अनुषंगाने परळी  तालुक्यातील 104 गावे सहभागी झाली आहेत या मधील  9 गावांची पहिली तुकडी आज जलसंधारणातून मनसंधारणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी दिपेवडगाव प्रशिक्षण केंद्र  ता.केज  येथे रवाना झाली .यामध्ये 21 महिला व  32 पुरुषांचा समावेश आहे. दुष्काळाशी दोन हात करण्यास निघालेल्या या गावांना शुभेच्छा देण्यासाठी परळी  तालुक्याचे नायब तहसीलदार श्री बरदाळे, पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री गुळभिले साहेब, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष धीरज जंगले माजी अध्यक्ष दत्ता काळे,धनंजय अरबुने,जगदीश शिंदे,ओमप्रकाश बुरांडे,महादेव गित्ते, तसेच सरपंच, ग्रामसेवक ,पानी फाऊंडेशन ची टिम व समस्त गावकरी उपस्थित होते.
    मा. नायब तहसीलदार साहेबानी शुभेच्छा देत असताना असे सांगितले की आपण सर्वांनी आयुष्यातील हे महत्त्वाचे क्षण आपले गाव पाणीदार करण्यासाठी 4 दिवस तुम्ही निसर्गाच्या भेटीला निघाला आहेत  या चार दिवसाचे प्रशिक्षण घेऊन येऊन नक्कीच हा आपला परळी तालुका पाणीदार करणार यात काही शंका नाही या संपुर्ण कार्यामध्ये आपल्या सर्वांच्या सोबत राहील व आपल्या प्रशिक्षण तसेच अभ्यास दौरयासाठी मी आपणास शुभेच्छा देतो हे प्रशिक्षण तुम्ही सर्वजन मन लावून शिका प्रत्येक सत्रात सहभागी व्हा.निश्चितच तुम्ही दुष्काळ रुपी राक्षसाचा सामना करण्याचे बळ घेऊन परत याल.आपण सर्वजण मिळून या दुष्काळाला आपल्या गावाबाहेर घालवू तुमच्या मदती साठी प्रशासन  सदैव तत्पर आहे अशी ग्वाही दिली व लालपरी ला झेंडा दाखवून बस प्रशिक्षणासाठी रवाना झाली.

No comments:

Post a Comment