तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 February 2019

सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्त्यानी दिली उज्वल संस्थेला भेट विद्यार्थी यांनी घेतली संस्थेची विविध माहिती 

वाशिम  -(जिल्हा प्रतिनिधी )दि .6 स्थानिक येथील सरस्वती समाजकार्य महा विद्यालय वाशिम च्या वतीने एम .एस .डब्लू .भाग दोन च्या विद्यार्थी यांना चौथ्या सेमिस्टर च्या अनुषंगाने संस्था अभ्यास दौरा करून विविध माहिती घेवून सादर करणे अनिवार्य असल्याने हे विध्यार्थी प्रा .पि .एन .संधानी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 6रोजी  हिंगोली येथील उज्वल या प्रसिध्द संस्थेला भेट देवून या संस्थेची कार्यप्रणाली , उदेश्य , कामकाज , ऐतिहासीक लेखाजोखा , संस्थेने राबविलेले विविध उपक्रम व सद्या कार्यरत उपक्रम , संस्थेचा उगम , तेथील पायाभूत सुवीधा , प्रशासकीय यंत्रणा, महिला कौटुंबिक सल्लागार केंद्र , बालकाश्रम याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली .ही माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाईकराव यांनी सखोल माहिती देवून विद्यार्थी यांचे अभिनंदन केले . यावेळी संस्थेचे सचिव उज्वल पाईकराव , मुख्या  धीपीका सौ प्रगती व्यास उपस्थित होत्या . यावेळी विद्यार्थी प्रविण पट्टेबहादूर , अंकुश ढेले , प्रकाश नेतने , साईनाथ वाघमारे , अमोल चव्हाण , ओम सानप , सूरज जयस्वाल , कु दैवता चाटसे , मंगल शिरसाठ इत्यादी विद्यार्थी यांनी माहिती घेतली .

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a comment