तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

राजीव गांधी पंचायत राज संघटन


तालुकाध्यक्षपदी यशवंत सोनवणे तर शहराध्यक्षपदी नवनाथ क्षीरसागर


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विचारातून काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू झालेल्या राजीव गांधी पंचायत राज संघटनच्या परळी तालुका अध्यक्षपदी यशवंत सोनवणे तर शहराध्यक्षपदी नवनाथ क्षीरसागर यांची नियुक्ती काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांच्या सूचनेवरून पंचायतराज  संघटन  जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी केली 


      भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामपंचायत पासून ते स्थानिक स्वराज्य संस्था व स्थानिक कार्यकर्ते यांना मार्गदर्शन व प्रेरणा देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने राजीव गांधी पंचायतराज संघटन हा जनकल्याणाचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे प्रत्येक गावात शहरातील वार्डात जाऊन सर्वसामान्य जनतेचे मतदारांचे मनोगत ऐकून त्यांच्या मदतीसाठी संघर्ष करणे शासकीय पातळीवर पाठपुरावा करणे व सर्व उपेक्षितांना मदतीचा हात देणे मोदी सरकारचे खोटारडी आश्वासने उघडी पाडणे हे पंचायत राज संघटन ची उद्दिष्टे आहेत


        या संघटनच्या तालुकाध्यक्षपदी यशवंत पांडुरंग सोनवणे तर शहराध्यक्षपदी नवनाथ वैजनाथ क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली  राजीव गांधी पंचायत राज अभियान प्रत्येक गावात वार्डात पोहोचवु असा निर्धार सोनवणे व सिरसागर यांनी व्यक्त केला


      दरम्यान या निवडीबद्दल उभयतांचे स्वागत बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर पापा मोदी पंचायत राज संघटनचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत मुंडे, परळी विधानसभा  युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा  परळी मार्केट कमिटीचे  उपसभापती  प्रा  विजय मुंडे शहराध्यक्ष बाबुभाई नंबरदार, जि प सदस्य प्रदीप भैया मुंडे व अन्य परळी तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे

No comments:

Post a Comment