तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

शिक्षक आत्महत्या प्रकरणी मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखलतेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील राजीव गांधी विद्यालयातील प्रकार

तेल्हारा- तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील शिक्षकाने शाळेतील मुख्याध्यापकच्या त्रासाला कंटाळून शाळेतच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली.याप्रकरणी सदर मुख्याध्यापकाविरुद्ध हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
                    तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील राजीव गांधी विद्यालयातील शिक्षक गजानन नारायण इंगळे रा तेल्हारा यांनी काल दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यान शाळेतील एका वर्गखोली मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. राजीव गांधी विद्यालयातील मुख्याध्यापक व इंगळे यांच्यामध्ये शाळेतील काही कारणास्तव दि. ९ फेब्रु. वार शनिवार रोजी शाळेतील विद्यार्थ्यांसामोरच वाद झाला होता. काल सकाळी मुख्याध्यापक व इंगळे यांच्यात हमरी तुमरी झाल्यामुळे इंगळे यांनी त्यांच्या पत्नीला भ्रमणध्वनी वरून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. गजानन इंगळे यांनी एका वर्ग खोलीत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची बाब शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी इंगळे यांना ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली होती. त्यामुळे सदर आत्महत्त्या मुख्याध्यापक यांच्या जाचाला कंटाळून केल्याचे बोलल्या जात होते आत्महत्याने राजीव गांधी विद्यालयात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहे तर याप्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याप्रकरणी शिक्षक संघटना ,बेलखेड येथील नागरिकांनी निषेध नोंदवून आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नाही तिथपर्यंत मृतकाचे शव घेण्यास नातेवाईकांनी विरोध दाखवला होता

No comments:

Post a Comment