तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

घाटकोपर पश्चिम मध्ये शाखा क्र. १२९ च्या वतीने "भव्य मराठी पुस्तक प्रदर्शनबाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबईत :दि.१२ शिवसेना शाखा क्र. १२९ आणी अजब प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाखेमध्ये "भव्य मराठी पुस्तक प्रदर्शनाचे "आयोजन शिवसेना शाखा क्र. १२९  चे कार्यसम्राट शाखाप्रमुख श्री शिवाजी कदम यांच्या संकल्पनेतून  शिवसेना शाखा, जांभळी पाडा ,श्रीमान बाळासाहेब ठाकरे चौक , येथे आयोजित करण्यात आले आहे. या पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन राजेंद्र राऊत साहेब (विभागप्रमुख ईशान्य मुंबई विभाग क्रमांक ८ )यांनी केले .दीपप्रज्वलन डॉ.भारतीताई बावदाणे (ईशान्य मुंबई महिला विभाग संघटिका),  शाखा क्र. १२८ च्या नगरसेविका सौ. अश्विनीताई हांडे , मा.नगरसेविका  सौ.अश्विनीताई मते , मा.नगरसेवक  श्री दिपक (बाबा )हांडे ,मा.नगरसेवक श्री सुरेश आवळे यांनी केले. हे प्रदर्शन १२ फेब्रुवारी २०१९ ते २७ फेब्रुवारी २०१९ ,दरम्यान सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.१००/- रुपयापासून ते ६००/- रुपया पर्यतचे पुस्तक हे निव्वळ ७०/- रुपयात पुस्तकप्रेमींना खरेदी करता येणार आहे.
ऊद्द्वजी ठाकरे  साहेब यांची अप्रतिम फोटोग्राफी मिलिंद गुणाजी यांची ओघवती लेखनशैली महाराष्ट्रातील गड किल्ल्याचे वैभव दाखवणारे छायचित्राचे संपूर्ण रंगीत व सुबक संग्रह पुस्तके देखील उपलब्ध आहेत.तसेच कथा, कादंबरी, काविता, ललित, नाटक याबरोबरच चरित्र, आत्मचरित्र, माहितीपर, ऐतिहासिक, पर्यावरणीय, धार्मिक, राजकीय विषयांवरी पुस्तकांचा समावेश आहे. याशिवाय बालसाहित्य, पाककला, आरोग्य, मानसशास्त्र, विविध व्यवसाय मार्गदर्शन व स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तकेही आहेत. माझा लढा-अडॉल्फ हिटलर, माझी जन्मठेप, युगप्रवर्तक, स्वामी विवेकानंद , टिपू सुलतान , माझी जन्मठेप , माझा प्रवास , आजीबाईचा बटवा  तसेच राजकीय, सामाजिक , कला , आरोग्य , क्रीडा व्यक्तींचा प्रवास उलगडणारी पुस्तके या प्रदर्शनामध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत
या कार्यक्रमाला उपविभाग प्रमुख  श्री विलास पवार ,  सौ .चारूशीला चव्हाण, (उपविभाग संघटिका ),  श्री मंदार चव्हाण (सहसचिव युवासेना ),  श्री प्रदीप मांडवकर (विधानसभा संघटक ), श्री शमसुद्दीन शेख( विधानसभा संघटक ),  श्रीमती ज्योती भरडे (विधानसभा संघटिका,)  सौ अनिता ऊतेकर  (विधानसभा संघटिका ) श्री प्रेम यादव (विधानसभा समन्वयक ),  सौ .सुमंगल तेली (शाखा संघटिका १२८) श्रीमती पूजा सुर्वे (शाखा संघटिका १६०,)  श्री सतीश कोकाटे( युवा शाखाअधिकारी ),  कू.दिव्या जाधव (युवती शाखाअधिकारी ) कार्यालय प्रमुख -- श्री .संजय गीध (नाना),  श्री.महादेव (आप्पा) कानसकर ,  श्री. प्रकाश इंदूलकर , तसेच सर्व पुरुष/महिला उपशाखाप्रमुख , गटप्रमुख , महिला आघाडी ग्रा.सं.क , भा.वि.से .युवा सेना , समस्त शिवसैनिक उपस्थित होते .त्यावेळी मान्यवरांचा सत्कार समारंभ देखील झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यालय प्रमुख  श्री .संजय गीध (नाना)यांनी केले .

No comments:

Post a Comment