तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

कायदे विषयक ज्ञानाचा लाभ सर्वांंपर्यंत पोहचला पाहीजे - न्या. प्राची कुलकर्णीसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ५ ( प्रतिनिधी ) विधी सेवा प्राधिकरणाद्वारे देण्यात येणाऱ्या कायदे विषयक ज्ञानाचा व जागृतीचा लाभ गरीबातल्या गरीब माणसा पर्यंत पोहोचला पाहिजे असे विचार बीड जिल्हा न्यायाधीश श्रीमती प्राची कुलकर्णी यांनी गेवराई येथील कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात अध्यक्षीय समारोप करताना व्यक्त केले.
          रविवार, दि. २ फेब्रुवारी रोजी बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गेवराई  तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तथास्तु मंगल कार्यालयात मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात चिंतेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यिनींनी गायीलेल्या स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष अँड. कमलाकर देशमुख यांनी केले. अँड. स्वप्नील येवले यांनी दावा पूर्वीच्या तडजोडी या विषयावर मार्गदर्शन केले तर प्रलंबित खटल्यांबाबतची गंभीर स्थिती न्या. एन.आर.भळगट यांनी विशद केली. बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. शरद देशपांडे यांनी जेष्ठ नागरिकांच्या अधिकारा विषयी मार्गदर्शन करताना जेष्ठ नागरिकांच्या आजच्या दयनीय अवस्थे बाबत आणी जेष्ठ नागरिकांना असलेल्या कायद्याच्या संरक्षणाबाबत असलेल्या तरतुदींची माहिती दिली. अध्यक्षीय समारोप करताना बीड जिल्हा न्यायाधीश श्रीमती प्राची कुलकर्णी यांनी कायद्याच्या ज्ञानप्रसाराची आवश्यकता आणि त्या अनूषंगाने होत असलेले विधी सेवा समितीचे प्रयत्न, कार्यक्रम, सुविधा इत्यादी विषयी सविस्तरपणे माहिती दिली व गेवराई न्यायालय इमारत लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आणि सर्वांनी मिळून यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. गेवराई वकील संघाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत न्या. कवडे, न्या. गिरी, न्या.भळगट यांच्यासह छबूराव सानप, विक्रमराव पाटील, भागवतराव वेताळ, लहूराव लगड, शेख अब्बास, आण्णा सुतार, लक्ष्मीकांत कुलकर्णी, काबरा, काझी, मस्के आदी वकिलांनी केले.
   याप्रसंगी गेवराई न्यायालयाचे निवृत्त सहाय्यक अधिक्षक गौतम कांडेकर यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा न्या.एम.पी. एखे यांनी केले तर सुत्रसंचालन सुभाष निकम यांनी केले. या कार्यक्रमास वकीलांसह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment