तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 15 February 2019

पाथरीत जायवाडी पाटबंधारेचे कलशेट्टी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात


किरण घुंबरे पाटील
पाथरी:-  येथील जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्र.६ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहायक म्हणून कार्यरत असलेले मुकूंदराज भिमाशंकर कलशेट्टी शुक्रवार १५ फेब्रुवारी रोजी शेतक-या कडून चार हजाराची लाच घेताना कार्यालयातच रंगेहात एसीबीच्या जाळ्यात अडकले.
या विषयी सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार खेडूळा येथील शेतक-याने १४ फेब्रुवारी रोजी परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात जाऊन स्थापत्य अभियंता कलशेट्टी हे, या शेतक-याच्या  शेतातील उसाला कालव्याचे राखिव पाणी सोडण्या साठी चार हजार रुपयांची लाचेची मागणी करत असल्याची तक्रार दिली होती.त्या अनुशंगाने शुक्रवार १५ फेब्रुवारी रोजी दुपारी  मुकुंदराज भिमाशंकर कलशेट्टी यांना कार्यालयातच  रुपयांची लाच पंचा समक्ष स्विकारतांना लाचलुतपत अधिका,-यांनी  रंगेहात पकडले.या विषयी पाथरी पोलीसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आहे. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक संजय लाटकर, नांदेड परिक्षेत्र नांडेड , अप्पर पोलीस अधिक्षक नुर महम्मद शेख, यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपाधिक्षक गजानन विखे, पोह लक्षमन मुरकूटे, सचिन धबडगे, अविनाश पवार, माणिक चट्टे,  जमिल जहागिरदार, शेख मुखिद, चालक भालचंद्र बोके, नितिन काळे,  सारीका टेहरे, सावित्री दंडवते, आणि एसीबी परभणी यांच्या पथकाने केली.

1 comment:

  1. Ardhavat baatmi Kaa taaktay??
    Trap Karun fasavlay he pan siddhh hoilch udya... Te pan lihayla Nka visru 😡

    ReplyDelete