तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 28 February 2019

संजयकुमार सोनवणे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित


महादेव गित्ते
------------------------------
लोणी (प्रतिनिधी) :- 
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील रहिवासी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव ता.जामखेड या शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक संजयकुमार सोनवणे यांना त्यांचे शैक्षणिक,सामाजिक व धार्मिक कार्य बघून ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
संजयकुमार सोनवणे हे मूळचे संगमनेर तालुक्यातील शेडगाव चे रहिवाशी आहेत.नोकरीच्या निमित्ताने ते लोणी खुर्द येथे स्थायिक झाले आहे.आता पर्यंत त्यांनी राहाता, संगमनेर, जामखेड या तालुक्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदुर्खी खुर्द व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हार बु.येथे कार्यरत असतांना अनेक सामाजिक उपक्रम पार पाडले. डिजिटल वर्ग तयार केले.अपंगांसाठी असलेल्या 100 टक्के योजना राबविल्या,शालेय पोषण योजना यशस्वीपणे राबविली,स्वच्छ व सुंदर शाळा अ श्रेणीत आणली,शाळा सिद्धी श्रेणीत शाळा अ श्रेणीत आणली,लोक सहभागातून स्टेज निर्मिती केली,संगणक कक्ष स्थापन केला.ज्ञान रचनावादी वर्ग तयार केले,शालेय परिसरात डिजिटल कॅमेरे बसविले, गरीब विद्यार्थ्यांना स्व खर्चाने शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.चौदाव्या वित्त आयोगातून पाठपुरावा करून ग्रामपंचायत कडून मोठा निधी उपलब्ध करून शालेय विकास कामे केली.सहल, विज्ञान प्रदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रम, बाल आनंद मेळावे,विविध गुणदर्शन स्पर्धा,स्कॉलरशिप,टॅलेंट सर्च चित्रकला व रंगभरण, एक गाव एक गणपती इत्यादी सामाजिक व शालेय उपक्रम 100 टक्के राबविले.या शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष तुषार दाभाडे,
उपाध्यक्ष देविदास बनकर,कार्यप्रमुख अर्जुन राऊत यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.पुरस्काराबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटील,नामदार बाळासाहेब थोरात,नामदार शालिनीताई विखे पाटील,सुजय विखे पाटील, जि. प.अहमदनगर चे सीईओ विश्वजित माने, शिक्षण अधिकारी रमाकांत काठमोरे, गटशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, पोपटराव काळे,यांनी अभिनंदन केले.श्री सोनवणे सध्या जि.प.प्राथमिक शाळा नायगाव ता.जामखेड येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment