तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात एक कोटी सव्वीस लक्ष रुपयाच्या विकास कामाचा शुभारंभरिसोड महेंद्रकुमार महाजन 

 नगरपरिषदेच्या विविध प्रभागांमध्ये जिल्हा वार्षिक योजना दलितोत्तर नगरोत्थान अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन दिनांक 12 फेब्रुवारी 2019 ला वाशिम जिल्हा जन विकास आघाडीचे युवा नेते आदरणीय नकुलदादा देशमुख तसेच नगरपरिषद रिसोडच्या नगराध्यक्ष विजयमाला कृष्णा आसनकर, उपाध्यक्ष अशिया बी अब्दुल तसलीम व सर्व नगरसेवक यांच्या हस्ते पार पडले शहरातील प्रभाग 1 मध्ये तोष्णीवाल यांचे घरापासून आनंदी चौकापर्यंत कॉंक्रीट रस्ता व नाली बांधकाम ,प्रभाग क्रमांक दोन मध्ये अमरदास नगर मध्ये मारुती मंदिर ते देवराव पंडित यांचे घरापर्यंत रस्ता व नाली बांधकाम, मालेगाव नाक्यावर ठोकरे ते उमेश सरनाईक शालिग्राम शिंदे यांचे घरापर्यंत खडीकरण व काँक्रीट नाली बांधकाम . प्रभाग क्रमांक 4 मध्ये पंचशील चौक ते कालुभाई ड्रायव्हर यांचे घरापर्यंत पेविंग ब्लॉक रस्ता व नाली बांधकाम ,जुन्या सराफ लाईन मध्ये हनुमान मंदिरापासून अग्रवाल यांचे घरापर्यंत कॉंक्रीट रस्ता ,प्रभाग क्रमांक पाचमध्ये मिल्लत नगर मध्ये मुक्तार कुरेशी यांच्या घरापासून पठाण मिस्त्री यांचे घरापर्यंत रस्ता व नाली बांधकाम, गजानन महाराज मंदिर ते काळुसेठ यांच्या अपार्टमेंट पर्यंत पेविंग ब्लॉक रस्ता व नाली बांधकाम, श्रीकृष्ण नगरमध्ये सुभाष चोपडे ते सदाभाऊ चौधरी यांचे घरापर्यंत रस्ता व नाली बांधकाम असे तब्बल एक कोटी 26 लाख 49 हजार रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी लोकप्रिय युवा नेते नकुलदादा देशमुख यांनी रिसोड शहराच्या विकासासाठी जन विकास आघाडी कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी अध्यक्षा विजयमाला आसनकर यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन शहराच्या विकास करण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला त्या कामाचा आज शुभारंभ होत असून लवकरच इतर प्रभागांमध्ये विकास कामाची सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमास  माजी नगराध्यक्ष वसंतराव इरतकर ,यशवंतराव देशमुख , अॅड कृष्णा महाराज आसनकर ,.नगरसेवक राजू इरतकर ,संदीप भाऊ इरतकर ,संतोष चऱ्हाटे,शे  अकबर ,नारायणराव गायकवाड, पवनशेठ छीत्तरका ,सुभाष चोपडे , शे . सलिम, राजेश मोहळे ,कपिल पाटील कदम ,सागर शिरसागर ,काझी साहेब ,इरफान कुरेशी जैनुद्दीन निजामुद्दीन, अख्तर बागवान ,अल्ताफ भाई ,रियाज खा पठाण अजगर भाई नागरिक मोठया संखेने उपस्थित होते,

महेंद्रकुमार महाजन जैन 
9960292121
9420352121

No comments:

Post a comment