तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 February 2019

अशोक शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातुन लाडगांव व वीरगांव शाळेला ऑरो ( फिल्टर ) प्रदान...तांत्रिक शिक्षण ही काळाची गरज सौ. मंजुश्री मुरकुटे

गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

 विदयार्थ्यामध्ये जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास असेल तर तो विदयार्थी जीवनामध्ये यशस्वीच होत असतो, १० वी नंतर विद्यार्थ्यांनी काळाची पावले ओळखुन स्पर्धा परीक्षा यासह तांत्रिक शिक्षण हीच काळाची गरज असुन, ग्रामीण विदयार्थी शिक्षणापासुन वंचित राहु नये म्हणून माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी अशोक च्या माध्यमातुन सर्व सामान्यांना शिक्षणाची द्वार उघडून दिले असल्याचे प्रतिपादन अशोक शैक्षणिक संकुलाच्या संचालिका तथा समन्वयक सौ. मजुंश्री मुरकुटे यांनी वीरगांव ता. वैजापूर येथील सदगुरू नारायणगिरी महाराज विदयालय व कै. दादासाहेब पाटील उच्च माध्य. विद्यालयातील तसेच सदगुरू गंगागिरी महाराज न्यु हायस्कुल व उच्च माध्यमिक विदयालय लाडगाव येथील शाळेत ऑरो फिल्टर प्रदान कार्यक्रमाप्रसंगी केले.

   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विकास जगताप हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अशोक पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य अरूण कडू, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष संदिप जगताप, प्रा. ए.आर.चितळकर, प्रा. एस.ए. कोळशे, प्रा. ओ.ए. भालदंड, प्रा.आय.एस. शेख, वीरगांव शाळेचे मुख्याध्यापक विकास जगताप, लाडगाव शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कहाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
    अशोक शैक्षणिक संकुलाच्या संचालिका मंजुश्री मुरकुटे पुढे बोलतांना म्हणाल्या, वीरगांव भागातील अनेक विदयार्थी अशोक पॉलिटेक्निक मध्ये उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण घेत असुन भविष्यात हीच मुले त्यांच्या  कुंटूबासाठी आधार ठरणार आहे, दहावीनंतर क्षेत्र निवडतांना योग्य क्षेत्र निवडले तर अशक्य असं काहीच नसुन माजी आमदार मुरकुटे आणि रामकृष्ण बाबा पाटील यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असल्याचे तसेच येथील शाळेतील विदयार्थ्यांना क्षारयुक्त पाण्याऐवजी शुद्ध पाणी मिळण्यासाठी संकुलाच्या माध्यमातुन ऑरो देण्यात आला असल्याचे सौ. मंजुश्री मुरकुटे यांनी सांगितले.

   याप्रसंगी बोलतांना प्राचार्य अरूण कडू म्हणाले, ९वी आणि १o.वी नंतर विद्यार्थ्यासमोर काय करावे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो, भविष्याचा अचुक वेध घेऊन बौद्धिक पातळी  वाढवून, कौशल्य निर्माण करण्यासाठी पॉलिटेक्निक शिक्षण महत्वाचे असुन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या दुरदृष्टीतुन व अशोक शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातुन विदयार्थ्यासमोर पर्याय उपलब्ध असुन , आर्थिक अडचणी अभावे शिक्षणापासून वंचित राहु नये म्हणून राजर्षी शाहु महाराज स्कॉलरशीप योजना देखील उपलब्ध असल्याचे प्राचार्य श्री. कडू यांनी स्पष्ट केले.
   प्रास्ताविक व सुत्रसंचालन आर.डी. खिलारी यांनी केले तर आभार अनुक्रमे मुख्याध्यापक विकास जगताप व राजेंद्र कहाटे यांनी मानले. 
याप्रंसगी विरगांव शाळेचे एफ.के. राशिनकर , सय्यद एम.बी., एम.पी. ठोंबरे, आर.बी.आहिरे, के.डी. गोरक्ष,एस.आर. थोरात,लाडगांव शालेय व्यवस्थापनचे संतोष सोमवंशी, मनोज धनाड, विकास निगल आदी सह विद्यार्थी पालक उपस्थित होते.

1 comment: