तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 February 2019

सरस्वती समाजकार्याचे विद्यार्थी हिंगोली संस्थाभेटीत झाले सन्मानित



 विविध संस्थानी केले मार्गदर्शक यांचे कौतुक 

 विद्यार्थ्यानी या संस्थाचे मानले आभार 

फुलचंद भगत
वाशिम (जिल्हा प्रतिनिधी )  आज दिनांक 12 रोजी '
 स्थानिक येथील सरस्वती समाजकार्य महा विद्यालय वाशिम च्या वतीने एम .एस .डब्लू .भाग दोन च्या विद्यार्थी यांना चौथ्या सेमिस्टर च्या अनुषंगाने संस्था अभ्यास दौरा करून विविध माहिती घेवून सादर करणे अनिवार्य असल्याने हे विध्यार्थी प्रा .पि.एन.संधानी यांच्या मार्गदर्शनाखाली  दिनांक 6 रोजी  हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले होते.त्यांनी  जिल्ह्यातील कळमनूरी तालुक्यातील 'उगम ' ग्रामीण विकास संस्थेला भेट देवून या संस्थेची कार्यप्रणाली ,उदेश्य , कामकाज ,ऐतिहासीक लेखाजोखा ,संस्थेने राबविलेले विविध उपक्रम व सद्या कार्यरत उपक्रम , संस्थेचा उगम ,तेथील पायाभूत सुवीधा , प्रशासकीय यंत्रणा इत्यादी माहिती घेण्यात आली .ही माहिती संस्थेचे अध्यक्ष यादवराव पाईक राव यांनी सखोल माहिती दिली .व उज्वल या कौटुंबिक समुपदेशन केंद्राला भेट दिली तेव्हा अध्यक्ष प्रा .चंद्रकांत पाईकराव यांनी विद्यार्थ्याना माहिती दिली .व खाकीबाबा अस्थिव्यंग या संस्थेची माहिती मुख्याध्यापक यांनी दिली .व विहान आधार या संस्थेची माहिती प्रकल्प समन्वयक अलका रणवीर यांनी दिली . यावेळी विद्यार्थी यांनी या सर्व संस्थेत चांगली माहिती विचारून घेवून व अगदी चांगले कामं केल्याबद्दल या वरील संस्थेकडुन हे सरस्वती समाजकार्याचे विद्यार्थी हिंगोलीत सन्मानित झाले.यावेळी या संस्थेकडुन प्रमुख मार्गदर्शक प्रा.पि.एन. संधानी यांचे या संस्थेकडुन कौतुक झाले .या संस्थेकडुन हे विद्यार्थी सन्मानित झाल्याने या संस्थेचे विद्यार्थी यांनी आभार मानले.यावेळी प्रविण पट्टेबहादूर, अंकुश ढेले, प्रकाश नेतने, साईनाथ वाघमारे,अमोल चव्हाण, ओम सानप,सूरज जयस्वाल,कु दैवता चाटसे,मंगल शिरसाठ इत्यादी विद्यार्थी यांचे सन्मानपत्र देवून त्यांचा  गौरव करण्यात आला .

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment